Thursday, May 16, 2024
घरमानिनीअननसाचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक

अननसाचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक

Subscribe

अननस अतिशय चवदार आणि पौष्टिक फळ आहे. याची गोड आणि आंबट असल्याने त्याची चव लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते. अननसामध्ये सोडियम, पोटॅशियम, प्रोटिन्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स सी यासारखे पोषक घटक आढळतात. अननसाच्या सेवनाने शरीर निरोगी राहते आणि हंगामी आजारांचा धोका कमी होतो. पण, असे असले तरी अननसाचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक मानले जाते. अननस खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत.

अननस जास्त प्रमाणात खाण्याचे तोटे –

अननस हे आंबट गोड फळ आहे त्यात नैसर्गिक साखर असते. यात ग्लुकोज आणि सुक्रोज असतात. जर तुम्ही अननसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्ही डायबिटिसचे रुग्ण असाल आणि त्यात तुम्ही जास्त प्रमाणात अननस खाल्यास तुमची समस्या आणखीनच वाढू शकते.

- Advertisement -

अननस हे आम्लयुक्त फळ आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी अननसाचे सेवन विचारपूर्वक करावे. अशा व्यक्तींनी अननस जास्त खाल्यास पोटातील जळजळ वाढू शकते. त्याचबरोबर अननसामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे याचे जास्त सेवन केल्यास जुलाब, अपचन आणि उलट्यांचा त्रास संभवतो.

- Advertisement -

अननस जास्त प्रमाणात खाल्याने दातदुखी देखील होऊ शकते. अननसामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे दात किडण्याबरोबरच दातदुखीची समस्या उद्भवू शकते. दातांसोबत हिरड्यांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे अननसाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.

अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचे एंझाइम असते. जर तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेत असाल तर अननसाच्या अतिसेवनाने रक्तस्रावाची समस्या वाढू शकते. तसेच अननस खाणे प्रेग्नेंट महिलांनी टाळावे.

अननसाचा ज्यूस पिणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अननसाच्या ज्यूसचे सेवन कधीही रिकाम्या पोटी करू नये कारण अननसाच्या ज्यूसचे सेवन रिकाम्या पोटी केल्यास पोटात अस्वथ वाटू शकते. त्यामुळे अननसाचा ज्यूस रिकाम्या पोटी पिवू नये.

 

 

 


हेही पहा : Mango And Health : आंबा खा, पण जपून

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini