Sleep Divorce वेळी कपल्स फॉलो करतात हे खास नियम

Sleep Divorce वेळी कपल्स फॉलो करतात हे खास नियम

दिवसभरचा थकवा आणि धावपळीत दिवस घालवल्यानंतर रात्री शांत झोप घ्यावी असे नेहमीच वाटते. परंतु पार्टनर रात्रीच्या वेळी घोरणारा असेल तर झोपचे खोबरं होतं. संशोधनात असे समोर आले की. जर तुम्ही पार्टनरच्या घोरण्यामुळे सतत उठत असाल चर यामुळे तुम्हाला स्लिप एप्निया, मूड स्विंग्स, फोकसचा अभाव आणि पर्सनालिटीमध्ये बदल अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येवर समाधान म्हणजे स्लीप डिवोर्स.

स्लीप डिवोर्स ऐकल्यानंतर थोडं विचित्र वाटेल. पण यावेळी खास नियम फॉलो केले जातात. यावेळी एक पार्टनर हा दुसऱ्या पार्टनसोबत झोपत नाही आणि आपल्या सुविधेनुसार झोपतो. जेणेकरुन झोप पूर्ण होते. असे केल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटते.

तज्ञ असे सांगतात की, पार्टनरच्या सततच्या घोरण्यामुळे झोपचं खोबर होतचं. पण यामुळे तुमचे मुड स्विंग्स खुप होतात, तुमच्या व्यक्तिमत्वात बदल ही होतो. अशामुळे पार्टनरसोबत वाद होऊ लागतात. पार्टनरच्या घोरण्यामुळे झोपची वाट लागत असेल तर नात्यात समस्या येण्यास सुरुवात होते.

स्लीप डिवोर्सचे फायदे
-जेव्हा तुम्ही टेम्पररी स्लीप डिवोर्स प्रोसेसमध्ये असता तेव्हा झोपेच्या कमतरतेमुळे जी लक्षण दिसतात त्यापासून दूर राहू शकता
-असे केल्याने कपल्स पुरेशी झोप घेऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये नाते सुद्धा ठिक राहते
-झोपेत सुधारणा होतेच पण काही मानसिक आणि शारिरीक समस्येपासून तुम्ही दूर राहता
-कपल्सला स्वत: साठी पर्सनल स्पेस मिळतो, जेणेकरुन ते आपल्या सुविधेनुसार झोपू शकतात


हेही वाचा- लग्नाआधी ‘या’ 4 गोष्टी नक्की जाणून घ्या, नाहीतर…

First Published on: May 11, 2023 6:05 PM
Exit mobile version