‘स्टॅंडअप इंडिया’ मोहीमद्वारे घटवा वजन

‘स्टॅंडअप इंडिया’ मोहीमद्वारे घटवा वजन

उभे राहल्याने वजन होते कमी

‘आपल्या दैनंदिन जीवनातील ताण तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनाला आळा घालण्यासाठी स्त्री – पुरुषांच्या पुढे अनेक अडचणी येतात, मात्र केवळ दिवसातून दोन तास उभे राहिल्याने आपले वजन कमी होऊ शकते. अगदी लोकल प्रवासातील उभे राहण्याची अपरिहार्यताही आपले वजन कमी करू शकते’, असा दावा ‘व्हीएलसीसी’च्या प्रेसिडेंट वंदना ल्युथरा यांनी एका कार्यक्रमात केला आहे.

स्टॅंडअप इंडिया मोहीम

भारतीयांच्या जीवनातील हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘व्हीएलसीसी’च्या माध्यमातून लवकरच स्टॅंडअप इंडिया ही मोहीम येत्या २६ नोव्हेंबर पासून राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लोकांना आपल्या लठ्ठपणामुळे विविध आजार आणि अडचणींना सामोरे जावे लागते, त्यासाठी उभे राहणे हा उत्तम उपाय असल्याचे त्या पुढे म्हणाल्या आहेत. केवळ आहाराची पध्दती आणि पदार्थ बदलून अथवा टाळून चालणार नाही. साखर, तेल तुप टाळले तरी खूप फरक पडेल, असेही त्या म्हणाल्या. यासाठी शाळांमधून आणि पालकांच्या जागृतीने ही मोहीम राबवली जाणार आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ३७ सेंटर्स

व्ही एल सीसीचे भारत आणि नेपाळमध्ये ९६ वेलनेस सेंटर असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ३७ सेंटर्स आहेत. तर येत्या वर्षभरात महाराष्ट्रात आणखी आठ ठिकाणी सेंटर उभारले जाणार आहेत. यामध्ये यवतमाळ, धुळे, रत्नागिरी, नांदेड, वाशिम, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, सातारा,वर्धा आणि सोलापूर याठिकाणी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे सहा प्रशिक्षण केंद्रे असून आणखी ५ प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचा व्ही.एल.सीसीचा मानस असून त्यासाठी आता नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीला भारतासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भविष्य असून या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि स्वास्थ्याची जागृती करण्याची क्षमता असल्याचा दावाही वंदना यांनी यावेळी केला आहे. गेल्या काही वर्षांत या उद्योगाने १२ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – सावधान! गोड पेय पदार्थांमुळेही वाढतेय वजन


 

First Published on: November 13, 2019 5:15 PM
Exit mobile version