Wednesday, May 8, 2024
घरमानिनीKitchenजेवण बनवण्यासाठी स्टीलची भांडी योग्य की अ‍ॅल्युमिनियम ?

जेवण बनवण्यासाठी स्टीलची भांडी योग्य की अ‍ॅल्युमिनियम ?

Subscribe

जेवण बनवणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. जेवण बनवताना एक मोठी जबाबदारी म्हणून याकडे सगळेजण बघतात. अशातच बाजारात अनेक प्रकारची भांडी उपलब्ध आहेत. यात आपल्याला कोणती भांडी योग्य वाटतात ती आपण नेहमी घेतो. पण शरीराच्या दृष्टीने कोणती भांडी योग्य आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे. तसेच जेवण करत असताना कोणत्या पदार्थाला कोणती भांडी वापरावी याबद्दल देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अनेकदा तर स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियम यातील कोणती भांडी घ्यावी असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो तर आता या प्रश्नाचे उत्तर आपण या टिप्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्याचे फायदे

अॅल्युमिनियमची सर्वच भांडी वजनाने हलकी असतात. अशावेळी त्याचा किचनमध्ये वापर करणे सोप्पं असते. त्याचबरोबर, अ‍ॅल्युमिनियमची भांडी लवकर गरम होतात. अशावेळी जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर अ‍ॅल्युमिनियम धातू स्वस्त असल्याने या भांडयाची किंमतही जास्त महाग नाहीये.

- Advertisement -

अ‍ॅल्युमिनियम भांड्याचे नुकसान काय

अ‍ॅल्युमिनियमची भांडी लवकर गरम होत असल्याने ती लवकर काळी पडतात. तसेच भांड्याचे ऑक्सीकरण झाल्याने त्याची चमक फिकी पडते. अशावेळी या भांड्यांची स्वच्छता ठेवणे किचकट काम आहे. त्याचबरोबर या भांड्यांमध्ये जेवण बनवणे आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायक मानले जाते. कारण, ही भांडी काही काळानंतर काळपट पडतात. तसेच अ‍ॅल्युमिनियम हा धातु जेवणात मिसळतो व जेवण टॉक्सिक बनते. जे आपल्या शरीराच्या दृष्टीने घातक आहे.

Do Metals in Cookware Cause Cancer? | UPMC HealthBeat

- Advertisement -

स्टीलच्या भांड्याचे फायदे

स्टीलची भांडी लगेच स्वच्छ होतात. तसेच अनेक वर्षानंतरही त्याची चमक कायम ठेवणे शक्य होते. कारण ही भांडी काळी पडत नाहीत. तसंच, स्टील हा धातु जेवणात मिसळत नाही. त्यामुळं तुम्ही शिजवत असलेले जेवण हेल्दी राहते. यात तुम्ही आंबट-चिंबट जेवणाबरोबर सगळ्या प्रकारचे अन्न शिजवू शकता.

स्टीलच्या भांड्याचे नुकसान काय

स्टीलची भांडी ही अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांच्या तुलनेत वजनाने अधिक जड असतात. तसंच, स्टीलची भांडी गरम होण्यासाठी जास्त वेळ घेतात. त्यामुळं अन्न शिजवण्यासाठी जास्त गॅस आणि विजेची गरज लागते. त्याचबरोबर स्टीलची भांडी बाजारात उपलब्ध असलेल्या बाकी भांड्याच्या तुलनेत जरा महाग असतात.

अशातच तुमच्या हेल्दी लाइफस्टाइलसाठी आणि बजेटफ्री कुकिंगसाठी तुम्ही जर चांगला विचार करत असाल तर तुम्ही स्टीलची भांडीच वापरा. जरा खर्च होईल पण तुमच्या आरोग्याला याचा धोका होणार नाही. त्यामुळं शक्यतो जेवण बनवण्यासाठी स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा.


हेही वाचा : भांड्यांचा स्क्रब एक पण, उपयोग अनेक…

- Advertisment -

Manini