Summer Snacks- उन्हाळ्यात मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स

Summer Snacks- उन्हाळ्यात मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स

बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक परिक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टया सुरु झाल्या आहेत. त्यातच उन्हाळाही कडक असल्याने मुलांना दिवसा घराबाहेर खेळणेही कठीण झाले आहे. यामुळे मुलं दिवसभर घरातच असतात. घरात असल्याने त्यांना सतत काहीना काही खाण्यासाठी हवे असते. यामुळे या बच्चे कंपनीला रोज नवीन नवीन काय खायला द्यायचे असा प्रश्न घरातील महिलांना पडतोच पडतो. खरंतर सध्याच्या उन्हाळी वातावरणात मुलांना तेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थ देऊ नयेत. तर साधे पण पौष्टीक आणि सध्याच्या वातावरणात सहज पचतील आणि भूकही भागेल असे पदार्थ मुलांना खाण्यास द्यावे.

व्हेजिटेबल सॅलड, सँडविच
मुलं भाज्या खाण्यास कंटाळा करतात. पण त्याच भाज्यांचे सँडविच किंवा सॅलेड बनवले तर आवडीने खातात. यामुळे या दिवसात मुलांना मिक्स्ड व्हेजिटेबल सॅलड द्यावे. या सॅलेडमधून मुलांना प्रोटीन आणि फायबर मिळते. सॅलडमध्ये काकडी, टरबूज, ऑलिव्ह आणि चेरी टोमॅटो सारख्या पिवळ्या आणि हिरव्या भाज्या टाकल्यास दिसायला सॅलेड आकर्षक तर दिसेलच शिवाय ते त्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

फळे
टरबूज, संत्री आणि जर्दाळू यासारखी पाण्याने समृद्ध फळे तुमच्या मुलाचे हायड्रेशन वाढवू शकतात. या फळांमध्ये द्रवपदार्थाचे प्रमाण खूप जास्त असते आणि ते व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमचे चांगले स्त्रोत देखील असतात, जे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात.

पॉपसिकल्स
मुलांना पॉपसिकल्स आवडतात. यात वेगवेगळ्या प्रकारची फळे, दही आणि इतर नैसर्गिक घटकांचा उपयोग केला जातो. फळांपासून बनवलेले हे फ्रूट पॉप्सिकल्स खाण्यास अधिक चविष्ट तर आहेतच, शिवाय आईस्क्रीमऐवजी मुलांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

फळांची लस्सी
जर तुमची मुलं आवश्यक प्रमाणात पाणी घेत नसेल तर त्याला दही आणि दुधापासून बनवलेली लस्सी देण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी नवीन नवीन शकला लढवा. त्यांच्या आवडत्या कपमध्ये ही लस्सी सर्व्ह करा. आपण काहीतरी वेगळे खातोय असे त्यांना वाटेल.

तुम्ही पपई किंवा अननस लस्सी बनवू शकता. याशिवाय अननसात भरपूर पाणी तर असतेच पण त्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते आणि त्यामुळे हे उन्हाळ्यातील एक उत्तम फळ आहे.  तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असते.

वॉटर स्पा
पाण्यात चिरलेली स्ट्रॉबेरी, काकडी किंवा लिंबू घालून थोडा वेळ ठेवा. त्यामुळे पाण्यात या फळांची चव तर उतरतेच शिवाय रंगही बदलतो. गोड आंबट पाणी सरबतासारखे लागते. मुलांना हे सरबत आवडते. यात तुम्ही बेरी देखील वापरू शकता. यात हायड्रेटिंग गुणधर्म आहे. यामुळे मुलांना उन्हाचा त्रास होणार नाही.


Edited By- Aarya Joshi

First Published on: April 24, 2024 8:32 PM
Exit mobile version