दिवाळीत तुमच्या बेस्ट buddy pet’s ची अशी घ्या काळजी

दिवाळीत तुमच्या बेस्ट buddy pet’s ची अशी घ्या काळजी

भारतात सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसत आहे. सर्वच जण आंनदात दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळी साजरी करत असताना तुमच्या पाणीव प्राण्यांची सुद्धा काळजी घेणे खूप गरजेचे आहे आणि प्रामुख्याने दिवाळीच्या दिवसात तर पाळीव प्राण्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. दिवाळीच्या दिवसात सर्वच जण मजा करत असतात, फटाके फोडत असतात. अशातच आजूबाजूच्या परिसरात खूप गोंगाट असतो. त्या गोंगाटापासून पाळीव प्राण्यांना गोंगाटापासून सुरक्षित ठेवणे, फटाक्यांपासून सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या आहाराची काळजी घेणे सुद्धा गरजेचे असते.

पाळीव प्राण्यांची काळजी कधी घ्याल

१) पाळीव प्राण्यांना फटाक्यांपासून दूर ठेवा

पाळीव प्राणी फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने घाबरतात. त्यामुळे ज्या भागात फटाके फोडले जात नाहीत त्या भागात पाणीव प्राण्यांना फिरण्यासाठी घेऊन जा. फटाक्यांच्या धूर पाणीव प्राण्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक असतात.

२) घरात गाणी किंवा टीव्ही लावून ठेवा

घराबाहेर सर्वच जण फटाके फोडत असतात. अशातच पाळीव प्राणी जास्त वेळ घरात राहतील यासाठी घरात गाणी किंवा टीव्ही लावून ठेवू शकता.

३) पाणी पाजा

खूप गोंगाट असला की पाळीव प्राणी खूप घाबरतात. त्यामुळे त्यांना ठराविक वेळेने पाणी पाजत रहा.

४) पाणीव प्राण्यांना एकटे सोडू नका

तुम्ही स्वतः पाळीव प्राण्यांसोबत घरी थांबणे गरजेचे असते. त्याच सोबत त्यांच्या आवडीचे खाणे सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता

५) अँटी एन्झायटी इंजेक्शन द्या

दिवाळीच्या एक एक दिवस आधी तुम्ही तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांना अँटी एन्झायटी इंजेक्शनसुद्धा देऊ शकता. यामुळे पाळीव प्राणी फटाक्यांच्या आवाजाने आणि गोंगाटाने घाबरणार नाहीत.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांची दिवाळीच्या दिवसात काळजी घेऊ शकता.


हे ही वाचा – Health Tips : पीनट बटर खाताय? तर सावधान! होईल ‘हे’ नुकसान

First Published on: October 23, 2022 4:25 PM
Exit mobile version