Yoga In Corona: कोरोनातून रिकव्हरीसाठी ‘ही’ 4 योगासने करतील मोलाची मदत

Yoga In Corona: कोरोनातून रिकव्हरीसाठी ‘ही’ 4 योगासने करतील मोलाची मदत

Yoga In Corona: कोरोनातून रिकव्हरीसाठी 'ही' 4 योगासने करतील मोलाची मदत

भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: च्या आयोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे झाले आहे. शरीर स्वास्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित योगा करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. लक्षणे सौम्य असली तरी शरीर स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याची नितांत गरज आहे. योगा केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे कोरोनातून लवकरात लवकर रिकव्हर होण्यासाठी पुढील ४ योगासने नक्की करा. मात्र करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

अनुलोम विलोम


शरीरातून ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी अनुलोम विलोम आसन करा. एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास घेऊन सोडणे. या योगा प्रकारामुळे ताण तणापासून आराम मिळतो. फ्रेश वाटते.

प्रोनिंग

तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वसनाचा त्रास घालवण्यासाठी प्रोनिंग करणे कधीही उत्तम. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होते त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र त्या आधी प्रोनिंग करा याने आराम मिळू शकतो. पोटावर झोपून दीर्घ श्वास घ्या. या योगा प्रकार झोपून केला जातो. हा योगा केल्याने फुफ्फुसांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. श्वास घेण्याचा प्रवाह सुरळीत होतो.

साई

हा एक प्राणायमाचा प्रकार आहे. यात पहिल्यांदा नाकाने जमेल तितका श्वास आत घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर श्वास सोडताना ओठांचा पाऊट करून थोडा आ असा आवाज करत श्वास बाहेर सोडा. या प्राणायमाच्या प्रकारामुळे टेन्शरपासून आराम मिळतो. दिवसातून 5-6 वेळा 35-40 वेळा हा व्यायाम प्रकार करावा.

कपालभाती

कोरोनातून लवकर रिकव्हर व्हायचे असेल तर दिवसातून ५-६ वेळा कपालभाती या योगाप्रकार करा. कपालभाती करण्यासाठी मोठ्या श्वास घ्या. त्यानंतर हळू हळू श्वास बाहेर सोडा. जर श्वास बाहेर सोडताना काही दबाव जाणवला तर कपालभाती करू नका.


हेही वाचा – Happy New Year 2022: या वर्षी वजन कमी करायचयं मग या ५ गोष्टी वाचा

First Published on: January 7, 2022 8:39 PM
Exit mobile version