Home Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Home Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडण्याचे ‘हे’ आहेत फायदे
आपले घर कायम सुंदर आणि सकारात्मक राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण सगळेजण त्याच्या प्रयत्नात कायम असतो. अशातच आपण सकाळी घराबाहेर फक्त पाणी तर शिंपडतोच तसेच कधी कधी रांगोळी देखील काढतो. पण हळदीच्या पाण्याचे एक खास वैशिट्य आहे. जे आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे.
ज्योतिषशास्त्रात घरातील मसाले हे ग्रहांशी जोडलेले असतात. तसेच काही मसाले पूजेच्या वेळीही वापरले जातात. अशातच हळद हा या मसाल्यांपैकी एक महत्वपूर्ण मसाल्याचा पदार्थ आहे. त्याचबरोबर हळदीच्या पाण्यालाही चमत्कारिक म्हटले आहे. जिथे एकीकडे हळदीच्या पाण्याचे काही उपाय घरातील संकटे नष्ट करतात, तर दुसरीकडे घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने अनेक अद्भुत फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया…
हळदीच्या पाण्याचे ‘हे’ आहेत अद्भुत फायदे-
1. हळद अत्यंत पवित्र मानली जाते, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्यास सकारात्मकता येते आणि घरात दैवी ऊर्जा संचारते.
2. हळदीचे पाणी शुद्ध असते कारण त्या पाण्याचा उपयोग पूजेत केला जातो, त्यामुळे घराच्या मुख्य दारावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
3. घराचा मुख्य दरवाजा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्यास घरातील वास्तु आणि ग्रह दोष दूर होतात.
4. घराचा उंबरठा हा राहु ग्रहाशी संबंधित असतो, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्यास राहूचा प्रभाव पडत नाही आणि घरात प्रगती होते.
5. घराच्या मुख्य दारावर हळदीच्या पाण्यात 1 नाणे टाकून मग ते पाणी शिंपडून नंतर ते नाणे मंदिरात ठेवल्यास आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही.
अशाप्रकारे जर हे हळदीचे पाणी दररोज घरच्या बाहेर शिंपडले तर या सर्व गोष्टींचा फायदा तर होतोच. याशिवाय कोणत्याही प्रकारचे दोष किंवा नकारात्मकता घरात येत नाही. तसेच घराची उन्नती होते आणि कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.

हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये मोरपंख ठेवल्याने येते सुख-समृद्धी

First Published on: April 16, 2023 6:48 PM
Exit mobile version