घरभक्तीVastu Tips : घरामध्ये मोरपंख ठेवल्याने येते सुख-समृद्धी

Vastu Tips : घरामध्ये मोरपंख ठेवल्याने येते सुख-समृद्धी

Subscribe

भारताच्या अनेक पुरातन गंथ्रांमध्ये देखील मोराचा विशेष उल्लेख केलेला आहे. मोराला भगवान कार्तिक आणि देवी सरस्वतीचं वाहन मानलं जातं. मोर पंखांना घरात ठेवण्याचे ही अनेक अगणित फायदे आहेत.

ज्योतिष शास्त्रात मोरपंखांना अत्यंत शुभ मानलं जातं, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. इतकच नव्हे तर भगवान श्रीकृष्णसुद्धा त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करायचे. भारताच्या अनेक पुरातन गंथांमध्ये देखील मोराचा विशेष उल्लेख केलेला आहे. मोराला भगवान कार्तिक आणि देवी सरस्वतीचं वाहन मानलं जातं. मोरपंखांना घरात ठेवण्याचे अनेक अगणित फायदे आहेत. मोरपंखांच्या उपायाने अनेक प्रकारच्या दोषांचं निवारण होऊ शकतं. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.

- Advertisement -
  •  घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी
    घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची असेल तर घराच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) कोपऱ्यात १०-१२ मोरपंखांचा एक गुच्छ ठेवा, या उपायाने तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा टिकून राहील. इतकंच नाही तर घरातील भांडणं, कटकटी, वास्तुदोष यांचंसुद्धा निवारण होईल.
  •  आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी
    तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची असेल तर, तुमच्या देवघरात मोरपंख ठेवा, यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नेहमी खूश राहील. इतकच नव्हे तर तुम्ही तुमच्या पर्समध्येसुद्धा मोरपंख ठेवू शकता, या उपायाने तुम्हाला धन आणि विद्या या दोन्ही गोष्टी एकत्र प्राप्त होतील.
  • विद्या प्राप्तीसाठी
    खरंतर भगवान कार्तिक आणि देवी सरस्वती हे दोघेही बुद्धीची देवता आहेत, मोराचे पंख उशीखाली ठेवून झोपल्याने विद्यालाभ होतो. उशीत मोरपंख ठेवण्यासाठी तुम्ही मोराचे पंख थोडे कापून घ्या. उशीत मोराचे पंख ठेवून झोपल्याने माणसाला यश मिळते. हा उपाय करणाऱ्या व्यक्तीकडे अचानक पैसे येऊ लागतात आणि अशी व्यक्ती हळूहळू श्रीमंत होत जाते. मोरपंखांचा उपयोग केल्याने तुम्हाला कला आणि विद्येची प्राप्ती होते.

Trending news: What does Vastu Shastra say about peacock feathers, in which  direction it is beneficial - Hindustan News Hub

  •  पती-पत्नीमधील भांडणं मिटवण्यासाठी
    दोन मोर पंखांच्या जोडीला तुमच्या बेडरूममधील पूर्व आणि पश्चिम या दिशांना लावा, या उपायाने पती-पत्नीमधील तणाव दूर होऊन भांडणं मिटण्यास मदत होते. यासोबतचं दोघांमधील नातं घट्ट होऊ लागतं.
  •  मुख्यप्रवेश दारावर लावा मोर पंख
    जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त कारायची असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावा. ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे पंख लावल्याने धन चुंबकाप्रमाणे आपल्या घराकडे आकर्षित होते.
  •  व्यवसायात होईल वाढ
    तुम्ही तुमच्या दुकानातही मोराचे पंख लावू शकता, असे केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल. खरंतर आयुष्यात प्रत्येकाला माता लक्ष्मीची साथ मिळत नाही. पण ज्योतिषशास्त्राच्या काही उपायांच्या आधारे आणि विश्वास ठेवून आणि मेहनतीच्या जोरावर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो.

हेही वाचा :

Vastu Tips : घरातील ‘या’ 2 दिशेला कधीही लावू नका आरसा; नाहीतर व्हाल कंगाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -