‘या’ भाज्यांचे सेवन केल्याने हृदय राहील निरोगी

‘या’ भाज्यांचे सेवन केल्याने हृदय राहील निरोगी

हल्ली हृदयाच्या संबंधीत अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सध्याच्या युगात वाढत्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता आपल्याला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हृदय हे त्यापैकीच एक आहे. अशातच हृदयाचे संरक्षण करण्याचे अनेक उपाय आहेत. तसेच निरोगी आहार हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्याच वाईट सवयींमुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते, ज्यामुळे हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीजला सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही हृदयाचे आरोग्य चांगले ठेवू शकता.

हिरव्या भाज्या

सगळ्याच भाज्या आरोग्यदायी म्हणून ओळखल्या जातात. पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या हृदयासाठी चांगल्या भाज्या आहेत. या भाज्या आपल्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.

बीन्स

बीन्स हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे पचनशक्ती तर सुधारतेच, शिवाय हृदयाची स्थिती देखील सुधारते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यास बीन्सची भाजी हा एक उत्तम पर्याय आहे.

चिया आणि फ्लॅक्स सीड्स

चिया आणि फ्लॅक्स सीड्स सारख्या अनेक प्रकारच्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा -5 फॅटी अॅसिडचे चांगले स्रोत असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरू शकतात. डॉक्टर दैनंदिन आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

काकडी

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीच्या सेवनाने करा. तसेच काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते.

कांदा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कांद्याचा रस हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. कांद्यामध्ये पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, बी6 आणि तांबे यांसारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. याशिवाय कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही आढळतात. जे आपल्या हृदयासाठी फार गरजेचे आहे.

बीट

बीटमध्ये नायट्रिक नावाचा घटक असतो. ज्यामुळे रक्तदाब कमी राहतो. तसेच बीटचा रस प्यायल्याने रक्तदाब वाढत नाही. वजन कमी करण्यासाठी उत्तम फायबर्स आणि भरपूर प्रमाणातील पाणी यामुळे बीट हे वजन कमी करण्यासाठी उत्तम समजलं जातं.


हेही वाचा : महिलांमध्ये असते ‘या’ व्हिटामिनसची कमतरता

First Published on: August 7, 2023 5:17 PM
Exit mobile version