Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthमहिलांमध्ये असते 'या' व्हिटामिनसची कमतरता

महिलांमध्ये असते ‘या’ व्हिटामिनसची कमतरता

Subscribe

महिलांनी आपले आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी डाएटमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामध्ये पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण केली जाईल. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, महिलांमध्ये अशा कोणत्या व्हिटॅमिन्स-मिनिरल्सची कमतरता असते आणि ती कशी दूर करावी याच बद्दल अधिक.

लोह
महिलांमध्ये लोहाची कमतरता अधिक असते. कारण महिलांना प्रत्येक महिन्याला पीरियड्समधून जावे लागते. या दरम्यान खुप ब्लीडिंग होते. हेच कारण आहे की, लोहाची महिलांना अधिक गरज असते. लोहाच्या कमतरतेमुळे एनीमियाची समस्या होऊ शकते. या व्यतिरिक्त थकवा, श्वास घेण्यास समस्या, चक्कर येणे अशा सुद्धा समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

महिलांनी आपल्या शरिरात लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी आपल्या डाएटमध्ये लोहयुक्त फूड्स. जसे की, रेड मीट, पोल्ट्रीयुक्त फूड्स, मासे, फळं, टोफू, पालक याचे सेवन केले पाहिजे.

कॅल्शिअम
कॅल्शिअम हाडांच्या आरोग्यासाठी आणि ऑस्टियोपोरोसिस पासून दूर राहण्यासाठी फार महत्त्वाचे असते. नॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशनच्या नुसार, जर महिलेचे वय 50 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर प्रतिदिनी 1 हजार मिलीग्राम कॅल्शिअमची आवश्यकता असते. तसेच महिलेचे वय 51 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर प्रतिदिन 1200 मिलीग्राम कॅल्शिअमची आवश्यकता असते. याची पुर्तता पूर्ण करण्यासाठी डेयरी प्रोडक्ट्स, पालेभाज्या, बदाम, चीज, दही, पनीर आणि दूधाचे सेवन केले पाहिजे.

- Advertisement -

मॅग्नेशिअम
मॅग्नेशिअम शरिरातील स्नायूंच्या कार्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असते. हे शरिरात विविध केमिकल प्रोसेसिंगमध्ये फार महत्त्वाची भुमिका निभावतात. महिलांमध्ये बहुतांशवेळा याची कमतरता भासते. याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये ड्रायफ्रुट्स, नट्सचा समावेश करु शकता.


हेही वाचा- अति गोडं खाणे त्वचेसाठी ठरु शकते धोकादायक

- Advertisment -

Manini