तिळगुळाचे लाडू

तिळगुळाचे लाडू

तिळगुळाचे लाडू

मकरसंक्रातीला तिळाचे लाडू हे केलेच जातात. मात्र, बऱ्याचदा काहींचे लाडू कडक तर काहींचे फारच मऊ होतात. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रातीला असा गोंधळ होऊ नये याकरता आच तुमच्यासाठी आम्ही खास तिळगुळाच्या लाडूची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य

१/२ किलो तिळ
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी चण्याची डाळ
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप

कृती

१/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे. गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो. त्यानंतर पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा ‘टण्णं’ असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे. पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याची डाळ, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे, ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

First Published on: January 12, 2021 6:35 AM
Exit mobile version