जास्त मीठ खाल्ल्याने होतो मधुमेह

जास्त मीठ खाल्ल्याने होतो मधुमेह

मेंदूला होणार्‍या रक्तप्रवाहावर मिठाचा विपरीत परिणाम, रिसर्चमधून धक्कादायक माहिती उघड

आपण जेवणात मीठ कमी नसेल तर लगेच जेवणावरती मीठ घालून जेवतो. पण अशाप्रकारे मीठाचे सेवन करणे हे शरीराला हानीकारण असते. त्यामुळे जर मधुमेहापासून आपल्याला दूर ठेवायचे असेल तर केवळ साखर खाणे सोडून चालणार नाही त्यासाठी मीठाचे देखील प्रमाण कमी करावं लागेल. संशोधनानुसार, जास्त मीठ खाणे हे मधुमेहाचे कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. जास्त मीठ म्हणजे सोडियम खाल्ल्याने संशोधकांच्या मते उच्च रक्तदाबासाठी समस्या निर्माण होऊ शकते. आता नव्या संशोधनामुळे मधुमेह हा आजार होण्यात जास्त मीठ खाणं हे कारण महत्त्वाची भूमिका पार पाडते. लिस्बनमध्ये आयोजित युरोप असोसिएशन ‘फॉर द स्टडी ऑफ डायबिटिज’च्या वार्षिक बैठकीत यासंबंधी माहिती देण्यात आली.

जे लोक दिवसभरात २.५ ग्रॅमपेक्षाही जास्त मीठ खातात त्यांना टाईप २ डायबिटिजचा धोका ४३ टक्क्यांहून अधिक असतो. याशिवाय शरीराच्या आवश्यकतेपेक्षा ७.३ ग्रॅम जास्त मीठ खात असाल, तर टाईप २ डायबिटिजचा धोका वाढून तो ७२ टक्क्यांवर पोहोचतो.

First Published on: January 20, 2020 6:15 AM
Exit mobile version