Wednesday, May 15, 2024
घरमानिनीToxic shock syndrome म्हणजे नक्की काय?

Toxic shock syndrome म्हणजे नक्की काय?

Subscribe

टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा असा एक आजारा आहे जो शरिरासाठी फार धोकादायक मानला जातो. हा आजार स्टेफिलोकोकस ऑरियस किंवा स्टॅफ नावाचे बॅक्टेरिया अधिक वाढल्यामुळे होतो. हे बॅक्टेरिया महिलांच्या शरिरात अधिक प्रमाणात आढळतात. टॉक्सिक शॉक सिंड्रोम सर्वसामान्यपणे मासिक पाळी दरम्यान महिलांना अधिक प्रभावित करातात. खासकरुन अशा महिलांना ज्या टॅम्पॉनचा वापर करतात.

टॉक्सिक शॉक सिंड्रोम मध्ये ब्लड प्रेशर अगदी वेगाने कमी होऊ लागते. याच कारणास्तव शरिरात योग्य पद्धतीने ऑक्सिजन पोहचू शकत नाही. ज्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अमेरिकेतील २४ वर्षीय मॉडेल लॉरेन वारेस हिला २०१२ मध्ये हा आजार झाला होता. लॉरेनच्या शरिरात विषारी पदार्थ ऐवढा झाला होता की, ती आपला पाय सुद्धा उचलू शकत नव्हती. अखेर तिला आपला एक पाय कापावा लागला होता.

- Advertisement -

टॉक्सिक शॉक सिंड्रोमला मेंन्स्ट्रुअल स्पॉन्ज, डायाफ्राम आणि सर्वाइक कॅपशी ही जोडले गेले आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर सुद्धा महिलांमध्ये टॉक्सिक शॉक होण्याची संभावना वाढते. हे त्या पुरुषांना आणि महिलांना होऊ शकते जे सर्जरी, जळणे, ओपन घाव किंवा बनावट उपकरणाच्या उपयोगादरम्यान स्टॅफ बॅक्टेरियाच्या संपर्कात आले असतील.

- Advertisement -

टॉक्सिक शॉकसाठी एका तृतीयांशापेक्षा अधिक प्रकरणे १९ वर्षापेक्षा कमी वयातील महिलांमध्ये होते. तर ३० टक्के महिलांमध्ये हा आजार पुन्हा होऊ शकतो. या आजाराच्या कारणास्तव हृदय किंवा फुफ्फुसे काम करणे बंद करतात. टॉक्सिक शॉक संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. याच्या उपचारासाठी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टॉक्सिक शॉकची लक्षणं
-उलटी होणे
-अतिसार
-डोळे जळजळणे
-खुप ताप येणे किंवा थंडी वाजणे
-बेशुद्ध पडणे
-स्नान दुखणे
-डोके दुखी

यापैक एक लक्षण जरी तुम्हाला दिसत असतील तर लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


हेही वाचा: अल्पवयीन मुली टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कपचा वापर करु शकतात का?

- Advertisment -

Manini