ट्रेंडी डिझायनर मेंदी

ट्रेंडी डिझायनर मेंदी

ट्रेंडी डिझायनर मेंदी

सध्या लग्न सराई आहे. त्यामुळे बदलणाऱ्या काळात फॅशन ही बदलत आहे. त्याप्रमाणे आता मेंदीनेसुद्धा आपले रंग बदलले आहेत. लग्नात तर मेंदीही काढलीच जाते. कारण मेंदी लावलेले हात सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतात. सध्या फॅशन ट्रेंड असल्यामुळे बऱ्याच स्त्रिया डिझायनर ड्रेस आणि ज्वेलरीबरोबरच डिझायनर मेंदी काढतात. अनेक ट्रेंडी डिझायनर मेंदी काढल्या जातात याविषयी आपण जाणून घेऊया.

फँटसी मेंदी

फँटसी स्टाइल मेंदी म्हणजे जी मेंदी ड्रेस आणि ज्वेलरीच्या रंगांशी मेळ खात असलेल्या रंगांनी मेंदीची डिझाइन केली जाते. त्या डिझाइनला फँटसी स्टाइल मेंदी म्हटले जाते. सध्या या स्टाइलची मेंदी लोकप्रिय झाली आहे. तसेच या मेंदीत फँटसी मेकअपचा प्रयोग केला जातो. त्यानंतर डिझाइनच्या अनुरूप रंगबिरंगी खडे लावून ही मेंदी सजवण्यात येते.

अरेबियन मेंदी

अरेबियन स्टाइल मेंदी ही झटपट काढली जाणारी मेंदी आहे. ही मेंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच या मेंदीची डिझाइन फुला – पानांची असते. तर सध्या ही मेंदी काढण्यासाठी ब्लॅक केमिकलने आऊट लाइन काढून हिरव्या मेंदीने शेडिंग केले जाते. तसेच या मेंदीवर देखील तुम्ही सिल्हवर किंवा गोल्डन रंगाने डिझाइन करुन मेंदी सुरेख सजवून शकता.

जरदौसी मेंदी

जरदौसी मेंदी काढताना सिल्व्हर किंवा गोल्डन मेंदीचा वापर केला जातो. ही मेंदी सिल्व्हर किंवा गोल्डन शेडमध्ये असते. ही मेंदी फारच सुरेख दिसते.

मारवाडी मेंदी

राजस्थानसह मारवाडी मेंदीसुद्धा फॅशनमध्ये आहे. या स्टाइलच्या मेंदीमध्ये कड्याच्या आकाराचे डिझाइन काढले जाते. हे डिझाइन आकर्षित करणारे असते.

मोरक्कन मेंदी

मध्य प्रदेशमध्ये मोरक्कन मेंदी ही अतिशय प्रचलित आहे. मोरक्कन मेहंदी डिझाइन ही भौगोलिक आहे. सामान्यतः या प्रकारच्या डिझाइनमध्ये त्रिकोण, चौकोनी आणि गोलाकार याप्रकराच्या डिझाइन वापरून ही मेंदी काढली जाते. दोन्ही हातांवर एकसमान डिझाइन करणे ही मोरक्कन मेहंदी डिझाइनची खासियत आहे.

First Published on: May 22, 2019 7:30 AM
Exit mobile version