पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाच्या रसाचा असा करा वापर

पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाच्या रसाचा असा करा वापर

लिंबू हा औषधी गुणधर्माचा खजिना आहे. त्याचा रस पदार्थ आणि अनेक प्रकारचे पेय बनवण्यासाठी वापरला जातो. लिंबू चवीला आंबट असले तरी लिंबाचे फायदे अनेक आहेत. लिंबाचा वापर शरीरासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. लिंबामध्ये असणार्‍या अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल गुणांमुळे तुम्ही तुमच्या चेहर्‍यांवरचे डाग आणि पिंपल्स दूर करू शकतात.

पिंपल्यपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाचा रस

 

एका वाटीत लिंबाचा रस घ्या. त्यात कापसाचा बोळा बुडवून ज्या ठिकाणी मुरुमं आणि डाग असतील त्या ठिकाणी हलक्या हातांनी फिरवा. हा रस 10 मिनिटांपर्यंत राहू द्या. त्यानंतर पाण्यानं चेहरा धुवून घ्या. ही प्रक्रिया दिवसातून दोन वेळा करू शकता.

थोडा लिंबाचा रस आणि मध एकत्र करून मुरुमं असलेल्या ठिकाणी लावा. 5 मिनिटांपर्यंत ते चेहर्‍यावर ठेवून चेहरा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून एकदा करू शकता.

एका अंड्याचा सफेद भाग वेगळा करून घ्या. यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळून चांगल्या पद्धतीनं एकजीव करून घ्या. हे मिश्रण तुम्ही चेहर्‍यावर पाच ते सात मिनिटे लावा. ते सुकल्यानंतर धुण्याऐवजी पुन्हा एकदा या मिश्रणाचा एक थर लावा. त्यानंतर तिसरा थरही तुम्ही लावू शकता. त्यानंतर कोमट गरम पाण्यानं धुवून घ्या.

एका वाटीत चण्याची पावडर घ्या त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्या. त्याची चांगली पेस्ट बनवून पिंपल्स असलेल्या त्वचेवर लावू शकता. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. त्वचा कोरडी वाटल्यास थोडं माईश्चरायजरचा वापर करू शकता.

एका वाटीत लिंबाचा रस आणि दही एकत्र करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. काही वेळानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या.

लिंबू आणि टोमॅटोचा रस एकत्र करुन चेहर्‍याला लावल्यास त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच या मिश्रणाचा नियमित वापर केल्यास ब्लॅकहेड्स, पिंपल्स निघून जातात आणि त्वचेचा पोत सुधारतो. या उपायांमुळे काही दिवसांतच तुमचा चेहरा उजळून निघेल. आणि पिंपल्सची तुमची समस्या कायमची दूर होईल.

 


हेही वाचा :

सौंदर्य खुलवण्यासाठी खोबरे तेलाचे 7 फायदे

First Published on: September 15, 2023 12:59 PM
Exit mobile version