Wednesday, May 8, 2024
घरमानिनीकांद्यापासून बनविलेले 'हे' हेअर मास्क वापरा आणि केसगळती विसरा

कांद्यापासून बनविलेले ‘हे’ हेअर मास्क वापरा आणि केसगळती विसरा

Subscribe

कांद्याचा वापर करून तुम्ही केसगळती सुद्धा रोखू शकता आणि ते तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा चांगले असते. कांद्यामध्ये असे अनेक गुण असतात जे आपल्या शरीरासाठी आणि केसांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक ठरतात.

सध्याच्या धावपळीत जीवनात काही वेळा आपलं सतःकडे लक्ष देणं राहून जातं. सध्याची बदलती जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणाचा आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. प्रदूषणाचा परिणाम केसांवर सुद्धा होत असतो. त्यामुळे अनेक महिलांचे केस गळतात. पण वाढणारी ही केसगळती कशी थांबवावी किंवा त्यासाठी कोणते उपाय करावेत जेणेकरून केसांची नैसर्गिक वाढ होईल हे अनेकांना माहित नसते.

आपल्या पैकी प्रत्येकाच्याच घरी कांदा सहज उपलब्ध असतो. तर कांद्याचा वापर करून तुम्ही केसगळती सुद्धा रोखू शकता आणि ते तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा चांगले असते. कांद्यामध्ये असे अनेक गुण असतात जे आपल्या शरीरासाठी आणि केसांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक ठरतात. कांद्याचा वापर करून असेच दोन सोपे हेअर मास्क बद्दल जाणून घेऊया

- Advertisement -

 मध आणि कांद्याच्या रसाचा हेअर मास्क

अर्धा काप कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध घेऊन ते मिश्रण एकजीव करून घ्यावे. हा मास्क केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करावा त्यानंतर १५ मिनिटे तसाच ठेऊन द्यावा आणि मग माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा वापरू शकता. हा हेअर मास्क केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांची नैसर्गिक वाढ होते.

- Advertisement -

 नारळाचे तेल आणि कांद्याच्या रसाचा हेअर मास्क

पाच चमचे नारळाच्या तालात पाच चमचे कांद्याचा रस मिक्स करून तो मास्क केसांच्या मुळांना हलक्या हाताने लावा केसांच्या मुळांसोबतच केसांना ही लावा आणि हलक्या हाताने मसाज करून अर्धा तास हा मास्क तसाच ठेऊन द्या. अर्धा तास झाल्यावर माईल्ड शाम्पू किंवा कंडिशनर लावून धुवा. ठवड्यातून दोन वेळा हा मास्क तुम्ही केसांवर अप्लाय करू शकता. नारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांना योग्य ते पोषण मिळून केसगळती त्वरित कमी होईल.
हे दोन हेअर मास्क तुम्ही नियमित वापरले तर तुमची केसगळती नाकीयच कमी होईल. त्याचसोबत या संदर्भातील अधिकची माहिती तुम्ही डॉक्टरांकडून घेऊ शकता.


हे ही वाचा – घरच्या घरी तयार करा नॅचरल हेअर कलर

- Advertisment -

Manini