घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रव्हिडीओ कॉलवरुन उपचार; चिमुकल्याचा मृत्यू

व्हिडीओ कॉलवरुन उपचार; चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

नाशिक : डॉक्टरांनी तपासणी न करता व्हिडीओ कॉल करत परिचारिकाला उपचार करण्यास सांगितल्यानेच आठ महिन्यांच्या अर्णवचा मृत्यू झाला आहे. शिवाय, डॉक्तरांना विचारणा केली असता त्यांनी ठार करण्याची धमकी दिली आहे, असा आरोप अर्णवच्या वडिलांसह नातेवाईकांनी केला आहेत. दरम्यान, अर्णवचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असता नातेवाईकांनी गर्दी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे तणावमय वातावरण निर्माण झाले होती. पोलिसांनी मध्यस्थी होत संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तणावमय वातावरण निवळले.

राहुल सीताराम निकम यांच्या ८ महिन्यांच्या अर्णवला रविवारी (दि.९) चिरंजीव हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. डॉ. अभिजित सांगळे व डॉ. विकास महाजन यांनी अर्णवचे सिटी स्कॅन व रक्ताचे नमुने तपासल्यानंतर अर्णव अ‍ॅडमिट करा, सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, उपचार केल्यानंतर दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देवू, असे सांगितले. त्यानुसार राहुल निकम यांनी अर्णवला अ‍ॅडमिट केले. अर्णववर उपचार सुरु असताना स्टाफ व डॉ. सांगळे आणि डॉ. महाजन दैनंदिन तपासणीसाठी अर्णवची भेट घेत नव्हते. ते परिचारिकेला व्हिडीओ कॉलव्दारे अर्णववर औषधोपचार करत होते. मात्र, अर्णवच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. डॉक्टर राहुल निकम यांची भेट घेत नव्हते. अर्णवची प्रकृती खालावली आहे. त्यास व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल, असे सांगत डॉक्टरांनी उपचारासाठी एक लाख रुपये घेतले.

- Advertisement -

अर्णवची मंगळवारी (दि.११) प्रकृती खालावली. राहुल निकम यांनी परिचारिकेला अर्णव हालचाल करत नसल्याचे सांगितले. त्यानुसार परिचारिकेने डॉ. सांगळे यांना कॉल केला. मात्र, डॉ. सांगळेंनी व्हिडीओ कॉलवरच अर्णवला पाहिले व उपचार सुरु करण्यास सांगितले. मात्र, अर्णवचा मंगळवारी (दि.११) सायंकाळी ४ वाजेदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी राहुल निकम यांनी उपचाराबाबत विचारणा केली असता डॉक्टरांनी त्यांना ठार करण्याची धमकी दिली. त्यानंतर सासरे नाना प्रल्हाद सोनवणे यांना धमकावले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करावी. डॉक्टरवर खूनाचा गुन्हा दाखल करावा. चिरंजीव हॉस्पिटल कायमस्वरुपी बंद करावे, असे अर्णवचे वडील राहुल निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी निवेदनाच्या पती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

अर्णवच्या मृत्यूप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने वैद्यकीय अहवाल दिल्यानंतर चिरंजीव हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाईल. : सुनील रोहकले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मुंबईनाका

अर्णवच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी पत्र रुग्णालयात आले आहे. तज्ज्ञ समितीमार्फत अर्णववर योग्य पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत की नाही, याची चौकशी करुन पोलिसांना अहवाल दिला जाईल. : डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -