Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeRecipe: झटपट तयार होणारी व्हेज पनीर बिर्याणी

Recipe: झटपट तयार होणारी व्हेज पनीर बिर्याणी

Subscribe

आपण भाताचे विविध प्रकार घरी बनवतो. व्हेज पुलाव असो किंवा व्हेज बिर्याणी. पण तुम्ही कधी व्हेज पनीर बिर्याणी ट्राय केली आहे का? आज आपण घरीच झटपट तयार होणारी व्हेज पनीर बिर्याणी याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तरपणे.

- Advertisement -

साहित्य-
-2 कप बासमती तांदूळ
-250 ग्रॅम पनीर
-2 कांदे
-2 टोमॅटो
-1/2 कप फ्लॉवर तुरे
-1 मोठा बटाटा
-1 मोठ गाजर
-1/2 कप मटार
-1 टीस्पून हळद
-1 कप दही घट्ट
-1-1/2 टेबलस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
-2 टेबलस्पून बिर्याणी मसाला
-पाणी गरजेनुसार
-4 ते 5 टेबलस्पून तेल
-1 टीस्पून जीरे
-तळलेला कांदा
-कोथिंबीर चिरुन
-चिरलेली पुदीन्याची पाने

- Advertisement -

कृती-
-सर्वात प्रथम बासमती तांदूळ धुवून घेत तो 30 मिनिटे तरी भिजत ठेवा.

-दुसरी स्टेप अशी की, आता दही फेटून घ्या. नंतर त्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, मीठ,तेल, हळद, भाज्या, पनीर, पुदीना, तळलेला कांदा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर टाकून सर्व जिन्नस एकत्रित मिक्स करुन 15 मिनिटे ते झाकून ठेवा.

-आता कुकरमध्ये तेल टाकून ते गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात जीरं टाकून आपण तयार केलेले मिश्रण टाका. या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवा. आता त्यात गरजेनुसार पाणी आणि मीठ घाला.

-भिजवलेला बासमती तांदूळ घाला आणि हलक्या हाताने तो मिक्स करा. कुकरचे झाकण लावून दोन शिट्टया काढा. अशा प्रकारे तयार होईल तुमची व्हेज पनीर बिर्याणी.


हेही वाचा- Recipe : झणझणीत चना भटुरा भाजी

- Advertisment -

Manini