घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाला पहिला विरोध केला तो लबाड लांडग्याने; पडळकरांची पवारांवर नाव घेता टीका

मराठा आरक्षणाला पहिला विरोध केला तो लबाड लांडग्याने; पडळकरांची पवारांवर नाव घेता टीका

Subscribe

यावेळी सभेला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मागील काही दिवसापूर्वी मी धनगर जागर यात्रा घोषित केली आणि लबाड लांडग्याच्या पिलावळींनी विष पेरायला सुरुवात केली.

सांगली : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले असून, त्यांनी पुन्हा एकदा 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तर धनगर आरक्षणासाठी आग्रही असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रभर धनगर जागर यात्रा काढली. या यात्रेचा रविवारी (22 ऑक्टोबर) समारोप सांगलीतील आडेवाडीतून करण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकरांनी शरप पवारांचा उल्लेख पुन्हा एकदा लांडगा असा करीत जहरी टीका केली. (The first opposition to the Maratha reservation was the vicious wolf Padalkars criticism of Pawar by name)

यावेळी सभेला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मागील काही दिवसापूर्वी मी धनगर जागर यात्रा घोषित केली आणि लबाड लांडग्याच्या पिलावळींनी विष पेरायला सुरुवात केली. ते म्हणत होते की, धनगर आरक्षणाची लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि गोपीचंद पडळकर दुसरीकडे धनगरांची जागर यात्रा काढतो आहे. मला त्या सगळ्या लोकाना सांगायचं आहे की, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण दोन टप्प्यात चाललो आहे. प्लॅन ए आरक्षणाची लढाई न्यायालयामध्ये लढतो आहे. ज्यामध्ये न्यायालयाने 8, 11 आणि 15 डिसेंबर या तारखा अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत. नाताळच्या सुटीनंतर धनगर आरक्षणाचा निकाल लागणार आहे. देशात सर्वात जास्त अन्याय धनगर समाजावर झाला आहे. धनगर समाजाच्या समितीने 170 पुरावे न्यायालयात दिले आहेत. तर राज्य सरकारने धनगड या राज्यात नाहीत असे शपथपत्रसुद्धा दिले आहे. याआधी 2019, 2022 आणि 2023 मध्ये सरकारने पुन्हा दोन शपथपत्र न्यायालयात दिले आहे. तेव्हा 101 टक्के निकाल आपल्या बाजूने लागेल. तरीही मी म्हटले आपण एका बाजुच्या लढाईवर अवंलबून न राहता रस्त्यावरच्या लढाईसाठी सुद्धा आपण तयार राहले पाहीजे. म्हणून महाराष्ट्रभर जागर यात्रेनिमित्त फिरलो असे स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

हेही वाचा :  मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा; सरकारी जाहिरातीवर अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

शालिनीताईंना पक्षातून काढले होते

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, आपल्यामध्ये फूट पडावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसे षडयंत्र रचले जात आहे. तर बहुजनांचा बुरखा पांघरलेला लांगडा हा बहुजनाच्या विरोधी किती हे आपल्याला माहिती आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे अशी भूमिका शालिनीताई पाटील यांनी आमदार असताना घेतली होती. तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर काढले होते. तेव्हा मराठा आरक्षणाला पहिला विरोध केला तो या लबाड लांडग्याने अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

- Advertisement -

हेही वाचा : TMC : महुआ मोईत्रांवर पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत; लाच प्रकरणावर मागवले उत्तर

पुतण्या फूटला अन् मागे लागले भुजबळांचे

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता थेट हल्ला केली. ते म्हणाले की, तुम्ही बघितले असेल की, त्यांचा पुतण्या पक्षातून बाहेर पडला. आता त्यांचा पुतण्या पक्षातून फुटला त्यात दुसऱ्यांचा काय दोष आहे. हे सगळेजण छगन भुजबळांच्या मागे शिव्या शाप द्यायला लागले. कारण, तो माळी समाजाचा माणूस आहे, गरीब माणूस आहे. पहिल्यांदा समता परिषदने महाराष्ट्रातील बहुजनाना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. जर बहुजन एकत्र आले तर महाराष्ट्रात काय होऊ शकतं हे या लबाड लांगड्याला माहिती आहे म्हणून आधी समता परिषदेला दाबण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असते पण काही आमदारांना फूस लावली आणि मुंडेंना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले. गोपीनाथ मुंडे जर मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्रात पहिला वंजारी समाजाचा मुख्यमंत्री झाला असता. म्हणजे हे जे सगळं षडयंत्र सुरू आहे त्याकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहलं पाहीजे असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -