व्हिटॅमिन ‘D’ ची कमतरता भरून काढणारे शाकाहारी अन्नपदार्थ

व्हिटॅमिन ‘D’ ची कमतरता भरून काढणारे शाकाहारी अन्नपदार्थ

सध्याची लाईफस्टाईल आणि कामाचे बदललेले स्वरूप यामुले प्रत्येकाला स्वतःच्या प्रकृतीकडे किंवा आरोग्याकडे लक्ष देणं राहून जातं. शरीराला उत्तम व्यायाम आणि सकस आहार हा गरजेचा असतोस पण त्या सोबतच आपण जो आहार घेतो त्यामधून शरीराला गरजेची असणारी सर्व जीवनसत्व मिळणं सुद्धा गरजेचं असतं.

व्हिटॅमिन ‘D’ ची कमतरता भरून काढण्यासाठी बहुतेक जणं कोवळ्या उन्हात बसतात पण तरीही त्यांच्या शरीरारीत व्हिटॅमिन ‘D’ ची कमतरता भरून निघत नाही आणि त्यामुळेच सांधेदुखी, दात दुखणे या समस्या जाणवतात तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा परिणाम होतो. असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ‘D’ ची कमतरता भरून निघते.

१) तीळ 

तिळाचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ‘D’ ची कमतरता भरून निघते. थालीपीठामध्ये तुम्ही तीळ घालून खाऊ शकता किंवा दिवसातून एक चमचा तीळ खाऊ शकता

२) मशरूम

मशरूम सुद्धा व्हिटॅमिन ‘D’ चा एक उत्तम स्रोत आहे. तुम्ही मशरूमची भाजी किंवा सॅलड करून खाऊ शकता

३) मक्याचे कणीस

मक्याच्या दाण्यांमध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘D’ असते त्यामुळे उकडलेएल मक्याचे दाणे खाणे सुद्धाही फायदेशीर ठरू शकते.

४) नाचणी

नाचणी मध्येही जास्त प्रमाणावर फायबर आणि व्हिटॅमिन ‘D’ जास्त प्रमाणावर असते. त्यामुळे नाचणी खाणे हे आरोग्यासाठी उत्तम राहते

५) सोयाबीन

व्हिटॅमिन ‘D’ चे सोयाबीन मध्ये जास्त प्रमाण असते तसेच ते हृसायासाठी सुद्धा खूप उत्तम असते. सोयाबीन हे व्हिटॅमिन ‘D’ चा उत्तम स्रोत आहे.

६) अक्रोड

अक्रोडाच्या सेवनाने व्हिटॅमिन ‘D’ तर मिळतेच पण त्यात सोबतच मेंदूच्या वाढीसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकते

व्हिटॅमिन ‘D’ मिळविण्यासाठी कोवळ्या सूर्यप्रकाशासोबतच या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. या संबंधीची अधिक माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता.


हे ही वाचा – दिवाळीचा फराळ करताना ‘या’ टिप्स फॉलो करा आणि आरोग्यही सांभाळा

First Published on: October 20, 2022 1:30 PM
Exit mobile version