vitamin B12 Benifit : शारिरीक अन् मानसिक त्रासातून सुटकेसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

vitamin B12 Benifit : शारिरीक अन् मानसिक त्रासातून सुटकेसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

vitamin B12 Benifit : शारिरीक अन् मानसिक त्रासातून सुटकेसाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

आपले संपूर्ण जीवन निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारातही योग्य त्या पदार्थांचे समावेश असणे गरजेचे आहे. वातावरणानुसार, आपल्या आरोग्यावरही त्याचे परिणाम होत असतात. दरम्यान व्हिटॅमिन-बी १२ याच्या अभावामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.मेंदूला तेज ठेवण्यासाठी ,हाडांची मजबूती वाढवण्यासाठी आणि गरोदर महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ हे घटक असलेल्या पदार्थांचे सेवन तुम्ही तुमच्या आहारात करु शकता.याशिवाय व्हिटॅमिन-बी १२ अॅनिमिया, काविळ,अल्जायमर या अनेक महारोगांपासून बचाव करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन बी १२ च्या अभावामुळे मेंदू आणि संपूर्ण नर्वस सिस्टमला धोका पोहचतो.त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात अनेक पौष्टीक पदार्थांचा समावेश करावा लागतो.

व्हिटॅमिन बी-१२ मुळे होणारे फायदे….

 

अंडी 

 

शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी रोज कमीत कमी अंडी खाणे गरजेचे आहे.त्यामुळे व्हिटॅमिन बी १२ चे घटक शरीराला मिळू शकतात.

 

सोयाबीन 

व्हिटॅमिन बी-१२ सोयाबीनमध्ये बऱ्याच प्रमाणात असून, व्हिटॅमिन बी १२ साठी सोया मिल्क,टोफू किंवा सोयाबिन तेलाचा वापर करु शकता.

ओट्स

ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत,व्हिटॅमिन बी-१२ चा हा चांगला स्त्रोत असून, ओट्स मुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

दुग्धजन्य पदार्थ

आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दूर करु शकतो.


हे ही वाचा – Health tips : हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी फॉलो करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स


 

 

 

 

 

First Published on: December 16, 2021 1:41 PM
Exit mobile version