घरताज्या घडामोडीHealth tips : हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी फॉलो करा 'या'...

Health tips : हिवाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी फॉलो करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Subscribe

हिवाळ्यात थंडीच्या दिवसात आपले आरोग्य निरोगी ठेवणे फार कठीण होते.त्यामुळे अनेकजण हिवाळ्यात आपल्या जीवनशैलीत आणि आहारात बदल करत असतात. प्राचीन भारतीय वैद्यक पध्दतीनुसार, काही सोप्या आयुर्वेदिक टिप्सचे पालन करुन तुम्ही तुमचे आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता.जाणून घ्या हिवाळ्यात आरोग्य सुधारण्याच्या काही  टिप्स.

हळदी दूध

थंडीच्या दिवसात उबदार वाटण्यासाठी लोक कॉफी किंवा चहा पित असतात.मात्र तितका परिणाम जाणवत नसून, चहा आणि कॉफीपासून मिळणारी उब ही फार कमी वेळापुरतीच असते. त्यामुळे या थंडीत चहाला बाजूला सारुन,तुम्ही हळद घातलेले दूध पिण्यास सुरुवात करा.या हळदीच्या दूधाने तुम्ही थंडी आणि थंडीपासून होणाऱ्या आजारांपासून स्वत:चा बचाव करु शकता. या हळदी दूधाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी दूधामध्ये दालचिनी पावडर,वेलची पावडरसुद्धा घालू शकता.

- Advertisement -

मालिश

तिळाचे तेल आणि राईच्या तेलाने मालिश करुन, तुम्ही तुमचे शरीर उबदार ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला थंडीपासून वाचण्यास मदत मिळेल.याशिवाय त्वचा चमकदार आणि कोमल राहते.त्यामुळे तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा अंघोळीपूर्वी मालिश करु शकता. मालिश केल्यामुळे तुमचे मन शांत राहून, तुमची तणावातून मुक्तता होईल.

नारळाचे तेल

थंडीच्या दिवसात केसांची समस्या वाढते.थंड हवेमुळे आपल्या केसांमधील जिवंतपणा निघून जातो.हिवाळ्यात आपल्या केसांचे पोषण वाढवण्यासाठी याशिवाय केसांची मजबूती वाढवण्यासाठी नारळाचे तेल गुणकारी ठरते. नारळाच्या तेलाने आपल्या केसांना मालिश केल्याने केस मजबूत आणि चमकदार होतील.

- Advertisement -

गरम पदार्थ खा

उन्हाळ्याच्या तुलनेने हिवाळयाच्या दिवसात आपली पचनसंस्था ही कमजोर होत असते.त्यामुळे थंडीच्या दिवसात थंड खाणे टाळून, गरम पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या.त्यामुळे थंडीच्या दिवसात गरम आणि पचनास सोपे असणारे पदार्थ खा.


हे ही वाचा – अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात कृति सेनन दिसणार मुख्य भूमिकेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -