‘लवकर निजे लवकर उठे…

‘लवकर निजे लवकर उठे…

Wake up early

लवकर उठण्याच्या सवयीचा दूरगामी लाभ होतो. करिअर, खेळ, आवडीनिवडी सर्वांनाच वेळ देता येतो. ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे’ खरंच हे विधान खरंय. ज्यांना लवकर उठण्याची सवय असते त्यांचे आरोग्यही उत्तम असते.

निरोगी आयुष्यासाठी आपण रोज सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी लवकर उठल्याने शरीरावरचा ताण कमी होतो व पूर्ण दिवस आनंदात जातो. या सवयीमुळे तुम्हाला व्यायाम करण्यास वेळ मिळतो. व्यायाम केल्याने शरीरात रक्तसंचलन वाढते. त्यामुळे हृदयाची प्रक्रिया सुरळीत राहते, तर हृदयासंबंधित आजार होण्यापासून व्यक्ती दूर राहतात. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटते व त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होतो.

सकाळी लवकर उठल्याने फुफ्फुसांना स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन मिळतो. ज्यामुळे श्वसनासंबंधित त्रास होण्याची शक्यता कमी होते. त्याचसोबत शरीरातील फुफ्फुसे उत्तम राहतात.

सकाळी लवकर उठणारे लोक उशिरा उठणार्‍या लोकांपेक्षा उत्साही आणि कार्यक्षम असतात.

लवकर उठणार्‍या लोकांची बुद्धी तल्लख असते. त्या व्यक्तीची सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते.

सकाळी माणसाच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते. त्यामुळे सकाळी लवकर उठून तो त्याचा सदुपयोग करू शकतो.

सकाळी लवकर उठल्यावर अनेक कामे पटकन होतात आणि काम करण्यासाठी वेळही मिळतो. लवकर उठलात तर सहज दोन-तीन तास वाचू शकतात.

शरीरस्वास्थ आणि मनाला शांती मिळते. सकाळी लवकर उठल्याने मन ताजेतवाने वाटते. सकाळी उठून मॉर्निंग वॉक, कसरत, जॉगिंग आदी व्यायाम करू शकता. त्यामुळे फिट आणि निरोगी राहता येते. आपले मन शांत असेल तर निश्चितच आरोग्य चांगले राहते. आरोग्य उत्तम असल्याने त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो.

First Published on: April 10, 2019 4:37 AM
Exit mobile version