उन्हाळ्यात वापरा हे स्टायलिश स्कार्फ

उन्हाळ्यात वापरा हे स्टायलिश स्कार्फ

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसात उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशावेळी तुम्ही विविध स्टाईलचे स्कार्फ वापरु शकता. जेणेकरुन उन्हापासून बचावही होईल आणि तुम्ही स्टायलिशही दिसाल.

उन्हाळ्यात करा या स्टायलिश स्कार्फचा वापर

 

कोणत्याही ऋतूत साईड क्नॉट या स्कार्फच्या स्टाईलचा वापर करता येतो. साध्या टॉपला स्टायलिश लूक आणण्यासाठी साईड क्नॉट स्टाईलचा स्कार्फ तुम्ही ट्राय करू शकतात.

या पद्धतीचा स्कार्फ वेस्टर्न टॉप असल्यास शक्यतो तरुणी वापरताना दिसतात. नावाप्रमाणे हा स्कार्फ बांधताना स्कार्फची क्नॉट लपवली जाते. त्यामुळे एक देखणा लूक तर मिळतोच; पण, ही स्टाईल वेगळी ठरते.

वेस्टर्न टॉप किंवा कुर्ता असणार्‍या रंगाला शोभेल असे दोन रंगांचे स्कार्फ घेऊन डबल ट्विस्टेड स्टाईल तुम्ही करू शकता. जो तुम्हाला हटके लूक सहज मिळवून देऊ शकतो.

फिकट रंगाच्या फॉर्मल शर्टवर नेक बो स्टाईलचा स्कार्फ ट्राय केल्यास वेगळा लूक तुम्हाला मिळेल. फॉर्मल्सवरही स्टाईल जरा हटके दिसण्यास मदत होईल.


हेही वाचा : 

First Published on: April 12, 2024 12:29 PM
Exit mobile version