‘या’ संकेतावरून ओळखा तुमचं relationship strong आहे का?

‘या’ संकेतावरून ओळखा तुमचं relationship strong आहे का?
आजकाल नात्यात अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने राहतात. रिलेशन मध्ये राहत असताना अनेक अडचणी किंवा मतभेद हे होत असतात. अशावेळी नात्यात दुरावा पण कधी कधी येतो. किंवा मग राग रुसवे हे त्या दरम्यान चालूच असतात. अशावेळी आपल्या मनात टोकाचा निर्णय घेण्याची इच्छा होते. आणि अगदी कसलाही विचार न करता हा निर्णय घेतला जातो आणि नातं हे टिकत किंवा तुटत.
अशावेळी आपल्याला कळून येत की आपला पार्टनर आपल्या सोबत कसा राहतो. किंवा मग एकूणच त्याचा थोडक्यात कसा स्वभाव आहे तो कळून येतो. पण हेच जर आपला पार्टनर जर खरा असेल तर त्याच्या नेमक्याच पण खऱ्या गोष्टी आपल्याला लगेच कळतात. त्यामुळे त्याच्या बद्दलचा विश्वास आपल्याला लगेच संपादित करता येतो.

आता आपण पाहूया कोणते संकेत आहेत जे तुमचे रिलेशनशिप स्ट्रॉंग असल्याचे सांगतात-

1. नात्यामध्ये विश्वास असणे गरजेचं-

कोणतेही नाते मजबूत होण्यासाठी त्यांच्यामध्ये विश्वास असणे आवश्यक आहे. तसेच दोघांचा एकमेकांवर किती विश्वास आहे ते बघणे ही तितकेच महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा गैरसमज नाही ना, हे जाणून घेणे आवश्यक आहे. एकमेकांवर विश्वास ठेवला तर नाते आनंदी राहते. कारण प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो.

2. रिलेशन मध्ये आदर असावा-
रिलेशनशिप मध्ये चांगले नाते ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे जोडीदाराचा तुमच्याबद्दलच्या वागणुकीचा आदर हा असलाच पाहिजे. आदरायुक्त जोडीदाराशी बोलणं असलं पाहिजे. कोणत्याही गोष्टी सांगताना किंवा बोलताना अरेरावी करून बोलता काम नये. यामुळे दुरावा वाढतो. कायम आदर राहत नाही. वादविवादाचा प्रश्न सारखा निर्माण होतो. म्हणून आदर करावा नटे सुरळीत चालते.

3. पार्टनर नेहमी साथ देणारा असावा-

नात्यात एकमेकांसोबत असणेही खूप महत्त्वाचे असते. आपला पार्टनर आपल्याला किती सपोर्ट करतो ते पाहणे गरजेचं आहे. असे नाही की काही चूक झाल्यास तो तुम्हाला इतरांसमोर जबाबदार धरेल. जर तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक प्रसंगी साथ देत असेल आणि तुम्हीही तेच करत असाल तर समजून घ्या की नात्यात प्रेम आणि ताकद कायम आहे.

4. पार्टनर कौतुक करणारा असावा-
जर तुमचा जोडीदार खूप सुंदर दिसत असेल आणि तरी देखील तुम्ही त्याचे कौतुक करत नसाल तर तुमचे प्रेम कुठे तरी कमी झाले आहे. ही गोष्ट दोन्हीकडून सारखी असणे फार गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा आपण खास काय काम करतो,आणि त्याचा आपल्याला माणसांकडून कौतुक होते. तेव्हा मनाला त्याचा जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो.
5. रिलेशनशिप मध्ये दुरावा येता काम नये-
तुम्ही तुमच्या जोडीदारापासून किती दूर आणि किती काळ दूर राहू शकता, ही गोष्टही नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगतात. जर तुम्ही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ तुमच्या जोडीदारापासून दूर राहू शकत नसाल आणि त्यांना खूप मिस करत असाल तर तुमच्या जोडीदारासोबतही असेच घडते, तर समजून घ्या की तुमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. मात्र, तुमच्या जोडीदारापासून दूर राहताना तुम्हाला फारशी उणीव जाणवत नसेल, तर तुमच्या नात्यातील ताकद कमी होत आहे. थोडक्यात तुमच्यात दुरावा येत आहे.

हेही वाचा :

मैत्री करताना काय काळजी घ्याल?

First Published on: April 20, 2023 3:13 PM
Exit mobile version