सफेद आंबा तुम्ही कधी खाल्लाय का? जाणून घ्या खासियत

सफेद आंबा तुम्ही कधी खाल्लाय का? जाणून घ्या खासियत

white mango

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरिरात काही बदल होत राहतात. खाणंपिण ते डेली वेअर कपड्यांपर्यंत सर्वकाही बदलले जाते. या ऋतूत काही खास फळं आणि भाज्या बाजारात उपलब्ध होतात. हेल्दी राहण्यासाठी लोक आपल्या डाएटमध्ये याच फळांचा आणि भाज्यांचा समावेश आवर्जुन करतात. त्यापैकीच एक म्हणजे आंबा. जे सर्वजण अगदी आवडीने खातात. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. (White mango speciality)

जगभरात आंब्याच्या विविध प्रजाती फार प्रसिद्ध आहेत. भारतातच त्याच्या प्रजाती आढळतात. लंगडा, हापुस, बदामी, अल्फान्सो अशा काही प्रजाती फार लोकप्रिय आहेत. परंतु तुम्ही कधी सफेद आंब्याबद्दल ऐकलेय किंवा खाल्ला आहे का?

सफेद आंबा ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. जी मूळ रुपात पूर्व एशियात आढळते. यामध्ये सफेद रंगाचा गर असतो. जो अतिशय गोड आणि खुप रसाळ असतो. आंब्याच्या अन्य प्रजातिंच्या विरोधात सफेद आंबा फार वेगळा असतो. जो आपल्या अनोख्या टेस्टमुळे फार लोकप्रिय असतो. हा आंबा आपल्या टेस्टसह आकर्षक रंगासाठी ओळखला जातो.

सफेद आंब्याला वानी असे म्हटले जाते. तो केवळ बाली या ठिकाणीच आढळतो. तो वरुन पाहिला असता अन्य आंब्यांसारखाच दिसतो. परंतु तो कापल्यानंतर आतमधून पूर्णपणे सफेद रंगाचा असतो. आपल्या अनोख्या रंग आणि टेस्टमुळे सफेद आंबा सर्वसामान्यपणे परदेशी मार्केटमध्ये खुप महाग विकला जातो. हा एक प्रकारचा हापूस आंबात असून त्याचे वजन जवळजवळ 150 ग्रॅम ते 300 ग्रॅम पर्यंत असते. याच्या लागवडीसाठी उच्च तापमानाची गरज असते. याचे वैज्ञानिक नाव ‘Mangifera indica’ असे आहे. (White mango speciality)

सर्वसामान्यपणे काही लोकांना याची टेस्ट हलकी अल्कोहोल सारखी लागते. काही लोक असे म्हणतात की, याची टेस्ट स्मोकी टुथपेस्टसारखी असते. आपल्या अनोख्या रंग आणि स्वादामुळे हा आंबा आरोग्यासाठी सुद्धा फार फायदेशीर मानला जतो. यामध्ये प्रोटीन आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये सफेद व्हिटॅमिन ए, फायबर आणि पोटॅशियम सुदअधा असते. यामुळे वजन कमी करणे, फुफ्फुसांची स्वच्छता, रक्तपुरवठा नियंत्रित करण्याचे गुण असतात. सर्वसामान्यपणे याता वापर ज्युस , दारु, आइस्क्रिम आणि अन्य मिठाईंसाठी केली जाते.


हेही वाचा- Gulkand Paan Recipe : घरी बनवा शरीराला थंडावा देणारे गोड गुलकंद पान

First Published on: June 4, 2023 12:07 PM
Exit mobile version