winter health tips: हिवाळ्यात आजारांपासून बचावासाठी डाएटमध्ये करा ‘या’ ५ पदार्थांचा समावेश

winter health tips:  हिवाळ्यात आजारांपासून बचावासाठी डाएटमध्ये करा ‘या’ ५ पदार्थांचा समावेश

हिवाळ्यात आजारांपासून बचावासाठी डाएटमध्ये करा 'या' ५ पदार्थांचा समावेश

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळा आला की अनेक आजारांना देखील सुरुवात होते. सर्दी, हात पाय दुखणे यासारखी अनेक दुखणी सुरू होतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. डॉक्टर देखील हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,हिवाळ्याच्या दिवसात आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या दिवसात आपल्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करावा ज्याने शरीराला उष्णता मिळेल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

हळद

गुळ

हळदीचा वापर जेवणार स्वाद आणि रंग आणण्यासाठी केला जातो. आयुर्वेदातही हळदीचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला गेला आहे. हिवाळ्याच्या दिवसात दूधात हळद टाकून सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढवण्यास मदत होती. हळदीचे दूध इम्युनिटी बुस्टर म्हणूनही पिऊ शकता.

 

गुळात व्हिटामीन सी, प्रोटीन,मॅग्नेशिअम सारखे घटक असतात. हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्यास खोकला दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गुळाचा चहा पिणे देखील आरोग्यासाठी उत्तम समजला जातो. शेंगदाणे किंवा चण्यासोबत तुम्ही गुळाचे सेवन करुन शकता. गुळाचे सेवन केल्याने व्हायरल इनफेक्शनचा धोका कमी होतो असे डॉक्टर सांगतात.

आलं

हिवाळ्याच्या दिवसात आलं घातलेला चहा पिणे कधीही उत्तम समजले जाते. हिवाळ्याच्या दिवसात आळ्याच्या चहाने मूड फ्रेश होतो आणि ताजेतवाणे वाटते.

खजूर

हिवाळ्यात खजूराचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज सकाळी गरम दूधासोबत खजूराचे सेवन करणे उत्तम मानले जाते.

तुप किंवा घी

 

भारतीय घरांमध्ये तुप किंवा घीचा वापर प्रत्येक मोसमास केला जातो. मात्र हिवाळ्याच्या दिवसात तुपाचे किंवा घीचे सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मोठी मदत होते. यात व्हिटामिन ई, ए यासारख्या महत्त्वाचे घटक असतात.


हेही वाचा – Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत झटपट बनवा केशर मूग डाळ बर्फी

First Published on: October 31, 2021 5:29 PM
Exit mobile version