महिलांनो सावधान! लिपस्टिकमुळे होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

महिलांनो सावधान!  लिपस्टिकमुळे होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

महिलांनो सावधान! लिपस्टिकमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

महिलांचे सौंदर्य लिपस्टिकमुळे आणखी खुलून येते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आज कालच्या फॅशनेबल काळात हजारो प्रकारच्या लिपस्टिकचे शेड्स बाजारात सहजपणे मिळतात . लिपस्टिक हा महिलांच्या जीवनातील अत्यावश्यक भागच बनला आहे.लिपस्टिकवीणा महिलांचा मेकअप अपुर्ण राहील्या सारखे वाटते. पण महिलांच्या सुंदरतेत चार चाँद लावणाऱ्या या लिपस्टिकमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच अनेक महिलांना ऐकून धक्काच बसेल की लिपस्टिक तुमच्या सुंदरतेला वाढवण्याचे नाही तर कमी करण्याचे काम करत आहे. अनेकदा नकळतपणे महिलांच्या पोटात लिपस्टिकचे काही कण चालले जातात.लिपस्टिकमध्ये असणाऱ्या रासायनिक पदार्थामुळे तसेच रासायनिक रंगामुळे अनेकदा  याचा वाईट प्रभाव महिलांच्या ओठावर होतो इतकेच नाही तर याचा शरीरावरही गंभीर परिणाम झाल्याचे अनेकदा आपण वाचतो.(Women beware! Lipstick can be cause serious illness)

लिपस्टिक लावल्यानंतर चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो. मेकअपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जर तुम्ही काहीच न लावता फक्त तुमच्या आवडत्या लिपस्टिकचा शेड्स ओठांवर लावला तरी तुम्ही सुंदर दिसू शकतात. लिपस्टिक चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवते. पण ही सुंदरत बनावटी असून आपल्या शरीराला आतून खराब करत असल्याचे उघडकीस आले आहे.अमेरिकेत झालेल्या एका संशोधना दरम्यान जगभरातल्या महिला एका वर्षाला तब्बल 22 ग्राम लिपस्टिक नकळतपणे खात असल्याचे उघड झाले आहे. लिपस्टिक लावल्यानंतर अनेकदा जेवण केल्याने तसेच चहा ,पाणी, ज्यूस,कोल्ड्रींक्स इत्यादी पदार्थांचे सेवन केल्याने नकळत लिपस्टिकसुद्धा शरीराच्या आतमध्ये जाते.

लिपस्टिकमध्ये फ्लोरीन नावाचे केमिकल वापरण्यात येते. आणि हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे संशोधना दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अमेरिके मधील सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर अंतर्गत करण्यात आलेल्या संशोधना दरम्यान जगभरातील टॉप ब्रॅण्डच्या प्रोडक्टमध्ये देखील या केमिकलचा वापर करण्यात येतो. तसेच लिपस्टिकच्या पॅकिंगवर या घातक केमिकल बाबत कोणतीही सावधानता आणि माहीती छापण्यात येत नाही. यामुळे महिलांना अनेकदा ॲसिडीटी तसेच थायरॉइड सारख्या गंभीर आजाराचा समाना करावा लागतो. इतकंच नाही तर लिपस्टिकमधील फ्लोरीन केमिकलचा साठा शरीरात जास्त प्रमाणात झाल्यास कॅन्सर सारखा घातक आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.


हे हि वाचा – पाठदुखीने त्रस्त आहात ? मग आधी चपला बदला

First Published on: August 12, 2021 4:06 PM
Exit mobile version