घरलाईफस्टाईलपाठदुखीने त्रस्त आहात ? मग आधी चपला बदला

पाठदुखीने त्रस्त आहात ? मग आधी चपला बदला

Subscribe

हाय हिल्स वापरल्याने पायांपासून ते पाठीपर्यंत वेदना होतात.

आजच्या काळता स्टायलिश दिसणंं, फॅशनेबल राहणं प्रत्येकालाच आवडते. जस-जशी तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे तस-तशी फॅशनमध्ये सुद्धा अनेक बदल घडत आहेत. पण अनेकदा या फॅशनमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. उंच टाचाच्यां चपला घालणे हे सध्याच्या काळात महिलांची पहिली पसंत बनली आहेत. हाय हिल्स परिधान केल्याने सुंदर,उंच तर दिसतोच मात्र यामुळे महिलांच्या आरोग्याला त्रास होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पाठदुखी किंवा पायदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही वापरत असलेल्या हाय हिल्स आधी बदला. कारण तुमच्या आरोग्याला हानीकारक असणाऱ्या गोष्टीपैंकी एक तुमच्या चपला आहेत. हाय हिल्स वापरल्याने पायांपासून ते पाठीपर्यंत वेदना होतात. यामुळे डॉक्टर देखील पायांना त्रास न होणाऱ्या चपलांची निवड करण्याचा सल्ला देतात.

हाय हिल्स वापरल्यावर होणारे दुष्परीणाम

- Advertisement -

हाय हिल्स वापरल्याने अनेक महिलांना कंबरदुखी,पायदुखी,पाठदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. हाय हिल्समुळे सध्या अनेक युवा तरुणी आर्थोपेडिक्स डॉक्टरांकडे धाव घेत आहे. कारण हाय हिल्स वापल्याने शरीराची सेंटर ऑफ ग्रॅवेटी बदलते यामुळे मॅकेनिकल पेन होते. शरीराचे मॅकेनिक्स बदलल्यामुळे सांधेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. उंच चपला घातल्याने गुडघ्यांवर तसेच पायांच्या टाचांवर प्रचंड दबाव पडतो. जर कोणी सतत हाय हिल्सच्या चप्पल वापरत असेल तर त्यांचे शरीर पुढच्या बाजूला वाकलेलं दिसतं. तसेच हिप्स आणि मनकेच्या हाढांमध्ये काहीसा फरक झालेला जाणवतो. यामुळे जर तुम्ही हाय हिल्सचा वापर करत असला तर फक्त गरजे पुरतचं काही वेळ त्याला घालणे तसेच काही वेळाने हिल्स काढून पायांना विश्रांती देणे महत्वाचे आहे.

चपलांची निवड कशी करावी?

- Advertisement -

बाजारत फॅशनेबल महागड्या,हाय हिल्स चपलांचा भडीमार आहे.पण यासोबत फ्लॅट्स,जुत्ती,फिल्प-फ्लॉप सारख्या सुंदर पण स्टायलिश चपला बाजारपेठेत उपलब्ध होतात. यापैकीच एखाद्या चपलेची निवड केल्यास शरीराला कोणतीही इजा होणार नाही.


हे हि वाचा- चॉकलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी,चॉकलेट खा आणि वजन कमी करा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -