वयाच्या पंन्नाशीनंतरही महिलांनी ‘अशी’ घ्यावी आरोग्याची काळजी

वयाच्या पंन्नाशीनंतरही महिलांनी ‘अशी’ घ्यावी आरोग्याची काळजी

वाढत्या वयासह तंदुरस्त राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. खरंतर वयाच्या पंन्नाशीनंतर सुद्धा तुम्ही फिट राहू शकता. पण वेळीच काळजी घेतली तरच हे शक्य होईल. कारण या वयात शरिराची हाजं कमकूवत होतात, स्नायू दुखतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी झालेली असते. वयाची पंन्नाशी ओलांडलेल्या काही महिलांना हृदयासंबंधित आजार, स्ट्रोक, टाइप-२ मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर असे गंभीर आजार होऊ शकतात. अशातच स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे फार गरजेचे आहे. अशातच वयाच्या पंन्नाशीनंतर महिलांनी नक्की कशी काळजी घ्यावी याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-नियमित तपासणी करा


जस जसे तुमचे वय वाढते तेव्हा आरोग्यासंबंधित आजार वाढू लागतात. त्यामुळेच वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांना भेटून नियमित तपासणी करुन घ्या. महिलांनी मॅमोग्राम, कॉलोनोस्कोपी आणि बोन डेंसिटी स्कॅन अशा चाचण्या कराव्यात.

-हेल्दी डाएट


जसे आपले वय वाढते तेव्हा आपल्या शरिराला कमी कॅलरीची आवश्यकता असते. परंतु तरीही आपल्याला पोषक तत्व असलेल्या संतुलित आहाराची गरज असते. आपल्या डाएटमध्ये भरपूर प्रमाणात फळ, भाज्या, लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश करावा. प्रोसेस्ड फूड, शुगर ड्रिंक आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन मर्यादित करावे.

-नियमित डाएट


नियमित व्यायाम हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. खासकरुन महिलांनी आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते करावेच. असे केल्याने तु्म्हाला हृदयासंबंधित आजार, मधुमेह यांपासून दूर राहता येते. दररोज अर्धा तास तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे.


हेही वाचा- Beauty Tips : महागड्या पार्लरला करा बाय बाय,बर्फ देईल सॉलिड look

First Published on: April 26, 2023 5:00 PM
Exit mobile version