Periods मध्ये दिवसातून किती वेळा pad बदलावे

Periods मध्ये दिवसातून किती वेळा pad बदलावे

मासिक पाळीच्या दरम्यान महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात. पण काही महिलांना माहिती नसते की, मासिक पाळी आल्यानंतर दिवसातून किती वेळा पॅड बदलले पाहिजे. खरंतर पॅड बदलणे हे महिलेच्या ब्लड फ्लो वर ही अवलंबून असते. त्यामुळे तुमचा जसा ब्लड फो असेल त्यानुसार तुम्ही पॅड बदलू शकता. परंतु कितीवेळा तो बदलावा आणि किती कालांतराने बदलावा हे प्रत्येक महिलेला माहिती पाहिजे.

खरंतर मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅड न बदलल्यास संक्रमण, खाज येणे, सूज येणे अशी लक्षण समोर येऊ शकतात. तर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका स्टडीत असे समोर आले होते की, सॅनिटरी पॅड न बदलल्यास योनित संक्रमण होऊ शकते, ज्याला डर्मेटाइटिसच्या रुपात ओळखले जाते. यामध्ये एक पॅड दीर्घकाळापर्यंत घातल्यास त्वचेवर जळजळ होऊ शकते.

कधी बदलावा सॅनेटरी पॅड
मासिक पाळीदरम्यान ब्लिडिंग होत असते. अशावेळी बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे दिवसभरातून तुम्ही सॅनिटरी पॅड ३-४ तासांमध्ये बदलले पाहिजे. आंतरिक स्वच्छतेसाठी हा फार बेस्ट पर्याय आहे.

मासिक पाळीवेळी ‘या’ चूका करु नका
-बॅक्टेरियाचा विकास होतो
मासिक पाळीवेळी होणाऱ्या ब्लिडिंग दरम्यान सॅनिटरी नॅपकिन बॅक्टेरियाच्या विकासाला उत्तेजन मिळते. याच कारणास्तव एका महिलेला युटीआय होऊ शकते. तज्ञांनुसार या गंभीर स्थितीपासून बचाव करण्यासाठी महिलांनी मेंस्ट्रुल कपचा वापर केला पाहिजे. अथवा आपले सॅनिटरी पॅड वेळोवेळी बदलले पाहिजे.

-कॅन्सर सुद्धा होऊ शकतो
मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये सॅनिटरी पॅडला स्वच्छ आणि किटाणूमुक्त बनवण्यासाठी फायबर क्लोरीन ब्लीच केले जाते. ब्लिचिंग प्रोसेस दरम्यान, डाइऑक्सिन उत्पन्न होते.


हेही वाचा- 30 व्या वर्षी आई होण्यासाठी करा स्वतःला तयार

First Published on: April 28, 2023 5:07 PM
Exit mobile version