Friday, May 3, 2024
घरमानिनी30 व्या वर्षी आई होण्यासाठी करा स्वतःला तयार

30 व्या वर्षी आई होण्यासाठी करा स्वतःला तयार

Subscribe

एका महिलेसाठी आई होणे हा आयुष्यातील फार मोठा निर्णय असतो. कारण जसे वय वाढत जाते तेव्हा प्रेग्नेंसीसाठी काही समस्या येऊ शकतात. अशातच तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षात असताना आई होण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

-प्लॅन तयार करा

- Advertisement -


प्रेग्नेंसीसाठी तुम्ही सर्वात प्रथम एक प्लॅन तयार करा. त्याचसोबत प्रेग्नेंसीचा आणि बाळाचा खर्च किती येऊ शकतो याची एक अंदाजे लिस्ट तयार करा. त्यानुसार तुम्ही तुमचे बजेट तयार करा.

-पार्टनरचा सपोर्ट

- Advertisement -


वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रेग्नेंसीचा प्लॅन करतेवेळी तुम्ही तुमच्या पार्टनरसह परिवारातील मंडळींचा सपोर्ट फार महत्वाचा असतो.

-डॉक्टरांना भेटा


संभाव्य धोके पाहता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरुर भेटा. जेणेकरुन प्रेग्नेंसी दरम्यान तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तसेच बाळाच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होणार नाही.

-फिजिकल चेकअप करा


प्रेग्नेसीचा विचार करण्यापूर्वी फिजिकल चेकअप जरुर करा. यामध्ये पॅप स्मीयर, बीपी आणि योनि संदर्भातील संक्रमाबद्दलची चाचणी करुन घ्या.

-औषधांबद्दल जाणून घ्या


या व्यतिरिक्त तुम्ही सध्या घेत असलेल्या औषधांबद्दल डॉक्टरांशी बोला. जेणेकरुन तुम्हाला कळेल की, प्रेग्नेंसी दरम्यान ती औषधे घेणे किती फायदेशीर आहे.

-आव्हाने स्विकारा


वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रेग्नेंसीसाठी समस्या येऊ शकतात. त्यामुळे त्यासाठी तुम्ही स्वत:ला तयार करा.

या व्यतिरिक्त गर्भधारणेवेळी जर काही समस्या येणार असतील तर डॉक्टर तुम्हाला त्या बद्दल आधीच सांगतात. तसेच त्यावर नक्की काय करावे हे सुद्धा तुम्हाला सांगितले जाते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्याचसोबत आपल्या ज्ञानात अधिक भर पडण्यासाठी पुस्तक आणि काही अशा वेबसाइटवर वाचा जे तुम्हाला प्रेग्नेंसी संदर्भातील अधिक माहिती देतील. तज्ञ सुद्धा यामध्ये तुमची मदत करु शकतात.

प्रेग्नेंसी दरम्यान महिलेचे वजन अगदीच कमी अथवा अधिक नसायला पाहिजे. त्यामुळे महिलांनी आपल्या डाएटकडे सुद्धा लक्ष द्यावे. तसेच नियमित थोडावेळ व्यायाम ही करावा. पण तो कसा आणि किती वेळ करावा हे मात्र डॉक्टरांना विचारा.


हेही वाचा- क्रिप्टिक प्रेग्रेंसी म्हणजे नक्की काय?

- Advertisment -

Manini