World Heart Day 2021: कॉफी, मायग्रेन आणि सेक्स देखील आहेत ‘हार्ट अटैक’ची कारणे

आज वर्ल्ड हार्ट डे असून धूम्रपान, चरबीयुक्त आहार, डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर, हाय कॉलेस्ट्रॉल आणि स्थूलता ही हार्ट अटैकची प्रमुख कारणे आहेत. पण अतिव्यायाम, मायग्रेन, अपुरी झोप, अतिआनंद, अतिदु:ख आणि सेक्स यांसह अनेक कारणे आहेत जी हृदयविकारासाठी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

अपुरी झोप– हे ेदखील हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक कारण आहे. एका संशोधनानुसार रात्री ६ तासाहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींला हृदयविकाराचा धोका हा रात्री ६-८ तासाची झोप घेणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत दुप्पट असतो. अपुऱ्या किंवा कमी झोपेमुळे ब्लड प्रेशर आणि छातीत जळजळ होते. छातीतील जळजळ ही नेहमीच अॅसिटीडीमुळे होते असे नाही तर ती हृदयविकाराची सुरुवातही असू शकते.

मायग्रेन- मायग्रेनचा संबंध थेट डोक्याशी व मेंदूशी आहे. पण असे असले तरी मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यावर स्ट्रोक, छातीत कळ येऊन हृदय बंद पडू शकते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे गरजेचे आहे. कारण मायग्रेनसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच वापरण्यात येणाऱ्या काही औषधांमुळे रक्तवाहीन्या संकुचित होतात. जेणेकरून हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक वाढतो.

थंड वातावरण-हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात रक्तवाहून नेणाऱ्या धमण्या संकुचित होतात. त्यामुळे हृदयाला नियमित होणारा रक्तपुरवठ्यात अडथळे येतात. यामुळे या दिवसात व्यायाम करावा. जेणेकरून स्नायू व मांसपेशीना उर्जा मिळेल.

अतिखाणंही हृदयासाठी घातक-बऱ्याच जणांना खाण्याची आवड असते. काहीजण तर भूक नसतानाही केवळ टाईमपास म्हणून पोट भरलेलं असतानाही खातात. पण हे अतिखाणं जीव घेणे ठरु शकतं. कारण अतिखाण्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन नोरएपिनेफ्रीन तयार होत. यामुळे ब्लड प्रेशर आणि हृदयाची स्पंदन वाढतात ज्यामुळे हार्ट अटैक येऊ शकतो.

चरबीयुक्त पदार्थांचे सेवनही हृदयविकाराला आमंत्रण देऊ शकते. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे रक्तात मेदाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे रक्तवाहीन्यांचे नुकसान होते.

अतिसंवेदनशीलता-राग,दुख, तणाव आणि अत्यानंद या मानवी स्वभावाच्या छटा आहेत. पण ज्यावेळी या भावनांचा अतिरेक होतो तेव्हा शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. अतिरागामुळे हृदयाचे ठोके वाढतात. हृदयावर ताण येतो. तर अतिआनंदामुळेही हृदयाचे स्पंदन वाढतात. तर सतत दुखा;चे चिंतन केल्यानेही हृदयावरही त्याचा परिणाम होतो. यामुळे कोणत्याही भावनेचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

व्यायाम- खरं तर व्यायामामुळे शरीरच नाही तर मनही सुदृढ राहत. यामुळे डॉक्टर नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देतात. पण अतिव्यायाम केल्याने हृदयावर ताण येतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो.

सेक्स-व्यायामाप्रमाणेच सेक्समुळेही हृदयावर ताण येतो. यामुळे जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Cold and Cough

कोल्ड फ्लू- २०१८ साली करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार सर्दी खोकला झाल्यास आठवडाभरानंतर संबंधित व्यक्तीला हार्ट अटैकचा धोका सहा पटीने वाढतो. तज्ज्ञांच्यामते संसर्ग झाल्यावर विषाणूशी लढताना रक्त चिकट होते. त्याच्या गुठळ्या होऊ लागतात. त्यामुळेही हार्ट अटैकचा धोका वाढतो.

चहा कॉफी- कामाचा ताण, थकवा घालवण्यासाठी अनेकजण चहा कॉफी घेतात. त्यामुळे फ्रेश वाटतं. पण या पेयांच्या अतिसेवनामुळे ब्लड प्रेशर वाढते. त्यामुळे हार्ट अटैकचा धोकाही वाढतो. दिवसाला दोन ते तीन कपपेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात.

First Published on: September 29, 2021 1:54 PM
Exit mobile version