उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी अनेक महिने भाजपवर टीका केल्यानंतर शेवटी हातमिळवणी करत भाजपशीच युती केली. यावर सर्वच स्तरातून टीका होत असून याचा फटका सेनेलाच जास्त बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तशी वेळ येऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे कंबर कसून कामाला लागल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
A view of the sea
Pravin Wadnere

शिवसेना आणि भाजपमधील रुसवा-फुगवा संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार, अशी घोषणादेखील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनेक सभांमधून केली होती. परंतु, अखेर शिवसेनेने भाजपसोबत युती केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती झाली आहे. परंतु, या युतीमागील प्रमुख कारण हिंदुत्व असून त्याची दिवंड पिटवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील शिवसैनिकांच्या खांद्यावर सोपवली आहे.

सविस्तर वाचा :

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना युतीची दवंडी पिटवण्याचे आदेश
Pravin Wadnere

शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर विरोधकांनी दोन्ही पक्षांवर टीकेची झोड उठवली. विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधत ‘इडीच्या भितीमुळेच शिवसेनेने युती केली’, अशी टीका देखील करण्यात आली. मात्र, आता शिवसेनेने युती का केली? याचं स्पष्ट कारण समोर आलं आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच ते कारण सांगितलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावलेल्या स्नेहभोजनादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांसमोर युतीचं कारण जाहीर केलं आहे. आणि हे कारण दुसरं-तिसरं कुठलं नसून, ते आहे स्वत: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन!

वाचा सविस्तर :

काय सांगता? उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांसाठी युती केली?
First Published on: February 26, 2019 4:21 PM
Exit mobile version