अचलपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४२

अचलपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४२

अचलपूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४२

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे. तर सध्या अपक्ष आमदार बच्चू कडू यांची या मतदारसंघात सत्ता आहे. अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील दुसरे तर विदर्भातील सातवे सर्वाधीक लोकसंख्या असलेले मतदारसंघ आहे. २०११ च्या जनगननेनुसार अचलपूरची लोकसंख्या २,७९,४७९ इतकी आहे. शहरातील फिनले मिलमुळे गावात लोकांना रोजगार उपलब्ध आहे.

मतदारसंघ क्रमांक – ४२

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,३४,१५४
महिला – १,१९,१६३
एकूण – २,५३,३१८

विद्यमान आमदार – बच्चू बाबाराव कडू ऊर्फ ओमप्रकाश, अपक्ष

आमदार बच्चू कडू हे विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्रातील मोठे नाव आहे. २००४ पासून ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत तीन वेळा त्यांनी अचलपूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. या तिनही वेळा ते भरघोस मतांनी जिंकून आले. गोरगरिब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मनात प्रचंड आत्मीयता आणि कळकळ आहे. वयाच्या तेराव्या ते चौदाव्या वर्षी त्यांनी गावात तमाशा बंदी करता आंदोलन केले होते. १९९४ साली शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरता त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर कापूस आणि वीज प्रश्नाकरता डेरा आंदोलन केले. त्यांचे डेरा आंदोलन फार गाजले होते. आदिवासींच्या जमिनीकरता त्यांनी अर्धदफन आंदोलन केले. स्वत:च्या लग्नाच्या खर्चातून बचत करुन २५० अपंगाना लग्न समारंभात तीन चाकी सायकली आणि कुत्रिम अवयवांचे वाटप केले. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना तयार केली. त्यांनी सुरु केलेल्या ‘प्रहार’ संघटनेचे आता वटवृक्ष होत आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना बऱ्याच सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

विद्यमान आमदार बच्चू कडू

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बच्चू कडू, अपक्ष – ५९,२३४
२) अशोक बनसोड, भाजप – ४९,०६४
३) अनिरुद्ध देशमुख, काँग्रेस – २६,४९०
४) मो. रफिक शेख गुलाब, बसप – २०,६०२
५) श्रीमती सुरेखा ठाकरे, शिवसेना – ५,७९१


हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघ

First Published on: July 30, 2019 5:43 PM
Exit mobile version