अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६३

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६३

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६३

गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६३

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,२१,१२६
महिला – १,१७,७४५
एकूण मतदार – २,३९,०७३

विद्यमान आमदार – राजकुमार बडोले, भाजप

विद्यमान आमदार राजकुमार बडोले

राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोर ते सध्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. राजकुमार बडोले हे उच्च शिक्षित आहेत. २००९ साली त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००९ साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर सडक अर्जुनी मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा भाजपच्या तिकीटावर विजय झाला.


हेही वाचा – ११ – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 18, 2019 9:52 AM
Exit mobile version