घरमहा @४८११ - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

११ – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

Subscribe

भंडारा-गोंदिया हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या भंडारा जिल्ह्यामधील ५ व गोंदिया जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. भंडारा हा ‘भनारा’ या शब्दाचा अपभ्रंश असावा कारण रतनपूर येथील उत्खनात इ.स.११०० मध्ये मिळालेला शिल्पलेखात ‘भनारा’ असा शब्दप्रयोग आढळतो. भंडारा जिल्हा हा वैनगंगेच्या खोऱ्यात उत्तर अक्षांश २१.१७° आणि पूर्व रेखांश ७९.६५° च्या दरम्यान वसलेला आहे. भंडारा जिल्ह्याचा उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा, पूर्वेस गोंदिया जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा व पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात दर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या ९८२ आहे. हेच प्रमाण ग्रामीण भागात ९८३ व शहरी भागात ९८१ आहे. तुमसर, लाखांदूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात जास्त ९९२ तर मोहाडी, लाखनी तालुक्यात सर्वात कमी ९७४ इतके आहे. वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत. जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली असे ३ उपविभाग आहेत. भंडारा उपविभागात २ तालुके असून , तुमसर उपविभागात २ तालुके असून ,साकोली उपविभागात ३ तालुके असून ८७८ गावे आहेत. गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.

मतदारसंघाचा क्रमांक – ११

- Advertisement -

नाव – भंडारा-गोंदिया

संबंधित जिल्हे – भंडारा आणि गोंदिया

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, भाताचे कारखाने

प्रमुख शेती पीक – भात, ज्वारी, तेलबिया, गहू, तूर

शिक्षणाचा दर्जा – ८३.८ टक्के


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – ११ लाख ९६ हजार २९१

महिला – ५ लाख ८० हजार ६९३

पुरुष – ६ लाख १५ हजार ५९७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सुनील बाबूराव मेंढे – भाजप – ६ लाख ५० हजार २४३

पंचबुधे नाना जयराम – राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ५२ हजार ८४९

डॉ. विजया राजे नंदुरकर – बहुजन समाज पार्टी – ५२ हजार ६५९

के.एन. नन्हे – वंचित बहुजन आघाडी – ४५ हजार ८४२

राजेंद्र पटेल – अपक्ष – १३ हजार १४५


भंडारा-गोंदिया विधानसभा मतदारसंघ

भंडारा जिल्हा

६० तुमसर – चरण वाघमारे, भाजप

६१ भंडारा (SC) – रामचंद्र अवसारे, भाजप

६२ साकरोली – राजेश काशीवार, भाजप

गोंदिया जिल्हा

६३ अर्जुनी मोरगाव (SC) – राजकुमार बडोले, भाजप

६४ तिरोडा – विजय रहांदळे, भाजप

६५ गोंदिया – गोपालदास अग्रवाल, काँग्रेस


NCP-Bhandara-Gondia-Madhukar-Kukde
मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस

विद्यमान खासदार – मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे नाना पटोले हे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र मोदीवरील नाराजीमुळे पटोले यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीसाठी मे २०१८ ला या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा पराभव केला. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा दारुण पराभव करत कुकडेंनी ४० हजारांहून अधिक मतांनी पटलेंचा पराभव केला.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ७० हजार ४७१

हेमंत पटले, भाजप – २ लाख ४३ हजार २०४

नोट – ४ हजार ०३०

मतदानाची टक्केवारी – ७२.३० टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -