भोकर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८५

भोकर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८५

भोकर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८५

नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. नांदेड जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोकर. याच मतदारसंघातून महाराष्ट्राला स्व. शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या रुपाने दोन मुख्यमंत्री मिळाले. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र २०१४ साली अशोक चव्हाण हे नांदेड मधून लोकसभेसाठी निवडणुकीला उभे राहिले आणि खासदार बनून दिल्लीत गेले. त्यानंतर मग या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण विजयी झाल्या.

मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांकडून पराभव झालेला आहे. तसेच त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांना कमी मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये हा विधानसभा मतदारसंघही त्यांच्या हातून निसटल्यास चव्हाण यांची राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकते.

मतदारसंघ क्रमांक – ८५

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,३७,६९४
महिला – १,२५,८१९
एकूण मतदान – २,६३,५१८

विद्यमान आमदार – अमिता अशोक चव्हाण, काँग्रेस

अमिता चव्हाण या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी आहेत. २०१४ साली अशोक चव्हाण लोकसभेत गेल्यानंतर त्या भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्या १९८६ पासून त्या काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून काम करत आहेत.

आमदार अमिता चव्हाण

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमिता अशोक चव्हाण, काँग्रेस – १,००,७८१
२) डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजप – ५३,२२४
३) बबन बारसे, शिवसेना – १२,७६०
४) धर्मराज देशमुख, राष्ट्रवादी – ७,७८५
५) डॉ. श्याम पवार, बसपा – ४,२९०


हे वाचा – नांदेड लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 18, 2019 10:56 PM
Exit mobile version