देगलूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९०

देगलूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९०

नायगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९०

नांदेड जिल्ह्यातील देगलूर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेला हा मतदारसंघ आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या बॉर्डरला लागून असलेला असा हा मतदारसंघ आहे. २००९ साली काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते, मात्र २०१४ साली भाजपच्या सुभाष साबणे यांनी त्यांचा पराभव केला.

माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर हे शासकीय अधिकारी होते. यावेळी देखील वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजय वरवंटीकर आणि गृह खात्यातून निवृत्त झालेले भी. ना. गायकवाड देखील देगलूरसाठी इच्छूक आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देगलूर मधून भाजपला २३ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र विधानसभेला ही आघाडी कायम राहीला का? हे निकालानंतर स्पष्ट होईल.

मतदारसंघ क्रमांक – ९०

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,४९,५०४
महिला – १,४०,८९३
एकूण मतदान – २,९०,३९७

विद्यमान आमदार – सुभाष साबणे, शिवसेना

विद्यमान आमदार सुभाष साबणे यांचा २०१४ साली ८, ६४८ मतांनी निसटता विजय झाला होता. त्याआधी नांदेडमधील मुखेड विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे वडील पिराजी साबणे हे देखील दहा वर्ष आमदार होते. साबणे हे दांडग्या जनसंपर्कासाठी मतदारसंघात ओळखले जातात. अवैध रेती वाहतुकीसाठी देगलूर मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिलेला आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. साबणे यांनी विविध शासकीय योजनांना लाभ मतदारसंघातील लोकांना करुन दिलेला आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.

आमदार सुभाष साबणे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुभाष साबणे, शिवसेना – ६६,८५२
२) रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस – ५८,२०४
३) भीमराव क्षीरसागर, भाजप – २०, ५४२
४) मारोती वाडेकर, राष्ट्रवादी – १२,०६२
५) डॉ. शुध्दोधन कांबळे, बसपा – ३६४१


हे वाचा – नांदेड लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 20, 2019 5:36 PM
Exit mobile version