घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७०

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७०

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातला घाटकोपर पूर्व हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात नागरी सुविधांचे प्रश्न प्रत्येक निवडणुकीत ऐरणीवर येतात. मात्र, इथल्या मतदारांनी निवडून दिलेले आमदार मंत्री झाल्यानंतर देखील इथल्या परिस्थितीत फारशी सुधारणा न झाल्यामुळे इथल्या मतदारांमध्ये नाराजी दिसून येते. या मतदारसंघात २२९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७०

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,३२,६२८
महिला – १,१५,८७२

एकूण मतदार – २,४८,५०१


प्रकाश मेहता

विद्यमान आमदार – प्रकाश मेहता, भाजप

६ वेळा सलग आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले मेहता शाळेत असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित राहिले आहेत. पुढे भाजपमध्ये पक्षीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर १९९०साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. गृहनिर्माण मंत्री असताना प्रकाश मेहतांवर घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे त्यांचे नाव वादात सापडले. त्यानंतर नुकतेच राज्य सरकारने केलेल्या मंत्रिमडळ विस्तारामध्ये त्यांच्याकडचे खाते काढून घेण्यात आले.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रकाश मेहता, भाजप – ६७,०१२
२) जगदीश चौधरी, शिवसेना – २६,८८५
३) प्रवीण छेडा, काँग्रेस – २१,३०३
४) राखी जाधव, राष्ट्रवादी – १०,४७१
५) सतीश नारकर, मनसे – ७६९६

नोटा – १८५०

मतदानाची टक्केवारी – ५६.३० %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ
First Published on: August 13, 2019 7:53 PM
Exit mobile version