घरमहा @४८२८ - मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ

२८ – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ

Subscribe

असा आहे मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ...

डम्पिंग ग्राउंडचा मतदारसंघ असंच या मतदारसंघाचं वर्णन करता येईल. मुलुंड, देवनार आणि कांजूरमार्ग असे तीन मोठे डम्पिंग ग्राउंड मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये आहेत. तसेच, मेट्रो आणि लोकलच्या हार्बर-सेंट्रल अशा दोन्ही लाइन या मतदारसंघात आहेत. त्यामुळे मुलभूत सोयीसुविधांच्या समस्यांचा आणि मुद्द्यांचा हा मतदारसंघ आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये डम्पिंग ग्राऊंडची समस्या इथे कोणत्याही खासदाराला सोडवता आलेली नाही. उत्तर भारतीय मतदारांसोबतच मराठी मतदार आणि मुस्लीम मतदारांचं प्राबल्य असा संमिश्र मतदारवर्ग इथे आहे. त्यामुळे खासदारकीसाठी कोणत्याही पक्षाची निश्चित अशी मक्तेदारी इथे तयार होऊ शकली नाही. त्यामुळे जशी लाट, तसे मतदान असा काहीसा होरा देखील इथे पाहायला मिळतो. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचं प्राबल्य हे या मतदारसंघाचं प्रमुख वैशिष्ट्य. त्यासोबतच हलाखीची परिस्थिती असणाऱ्या मानखुर्द-गोवंडी-शिवाजी नगरसारख्या भागाचाही इथे समावेश आहे. त्यामुळे आख्ख्या मुंबईचंच इथे मिनी प्रारूप पाहायला मिळतं.

मतदारसंघाचा क्रमांक – २८

- Advertisement -

नाव – मुंबई उत्तर-पूर्व

संबंधित जिल्हे – मुंबई उपनगर

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – मध्यमवर्गीय नोकरदार

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ९०%

महिला८६%

पुरुष९२%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ८ लाख ६१ हजार ६३८

महिला मतदार – ३ लाख ७५ हजार ९०३

पुरुष मतदार – ४ लाख ८५ हजार ६७७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

मनोज कोटाक – भाजप – ५ लाख १४ हजार ५९९

संजय दीना पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ८८ हजार ११३

निहारिका प्रकाशचंद्र खोंडाले – वंचित बहुजन आघाडी – ६८ हजार २३९

नोटा – १२ हजार ४६६


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१५५ – मुलुंड – सरदार तारासिंग, भाजप

१५६ – विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना

१५७ – भांडूप पश्चिम – अशोक पाटील, शिवसेना

१६९ – घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप

१७० – घाटकोपर पूर्व – प्रकाश मेहता, भाजप

१७१ – मानखुर्द-शिवाजीनगर – अबू आझमी, सपा


BJP MP Kirit Somaiya
भाजप खासदार किरीट सोमय्या

विद्यमान खासदार – किरीट सोमय्या, भाजप

१९७७ आणि १९८०च्या निवडणुकांमध्ये सलग २ वेळा सुब्रह्मण्यम स्वामी इथून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही खासदाराला इथून सलग निवडणूक जिंकता आलेली नाही. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा यंदाचा मार्ग खडतर दिसत आहे. शिवाय, विरोधात असताना डम्पिंग ग्राऊंड, लोकल सेवेमधील सुधारणा, फ्लाय ओव्हरचा प्रश्न अशा मुद्द्यांवर रान उठवणाऱ्या किरीट सोमय्यांना गेल्या ४ वर्षांत हे मुद्दे सोडवता आलेले नाहीत. शिवाय, माध्यमांसमोर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या किरीट सोमय्यांवर पुन्हा मतदार विश्वास दाखवतील का? असा प्रश्न मतदारच विचारत आहेत. २०१४मध्ये काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारविरोधात घोटाळ्यांची मालिका उघड करणाऱ्या किरीट सोमय्यांपुढे आता त्यांनी न सोडवलेल्या प्रश्नांची मालिका आहे. १९९५साली पहिल्यांदा आमदार म्हणून जिंकणाऱ्या सोमय्यांनी मुंबई भाजप अध्यक्ष, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस, भाजयुमो अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचा मुलगा नील सोमय्या मुलुंडमधून नगरसेवक आहे.

२०१४मधील आकडेवारी

किरीट सोमय्या – भाजप – ५ लाख २५ हजार २८५

संजय दीना पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ८ हजार १६३

मेधा पाटकर – आप – ७६ हजार ४५१

मछिंद्र चाटे – बसप – १७ हजार ४२७

नोटा७ हजार ११४

मतदानाची टक्केवारी – ५१.७०%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -