मुलुंड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५५

मुलुंड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १५५

मुलुंड विधानसभा मतदारसंघ

मुंबईच्या उत्तरेला असलेला हा पहिला मतदारसंघ आहे. सुरुवातीचा काही काळ सोडला, तर १९९०पासून म्हणजेच गेल्या सुमारे २८ वर्षांपासून मुलुंड विधानसभा मतदारसंघानं भाजपला साथ दिली आहे. १९९०मध्ये भाजपचे वामनराव परब या मतदारसंघातून निवडून आले होते. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून इथे सुटू शकलेला नाही. त्यासोबतच मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या अधिक असलेल्या या मतदारसंघात भाजपनं बाजी मारली आहे. या मतदारसंघात एकूण २८९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १५५

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५५,९०३
महिला – १,४२,३३६

एकूण मतदार – २,९८,२४२


सरदार तारासिंग

विद्यमान आमदार – सरदार तारासिंग, भाजप

सामाजिक कार्यामधून सरदार तारासिंग यांनी स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलुंड मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, शौचालये, बसथांबे, उद्यानांचा विकास अशी अनेक कामे तारासिंग यांनी केली आहेत. तसेच, तारासिंग मानव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलेल्या मोफत अन्नछत्रामुळेही त्यांना सामान्यांचा पाठिंबा मिळतो. त्याच पाठिंब्याच्या जोरावर १९९९पासून गेल्या सलग ४ विधानसभा निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्याआधी १९८४ ते १९९९ या कालावधीत ते मुंबई महानगर पालिकेवर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून देखील निवडून आले आहेत. राज्यपालांनी त्यांचा उत्कृष्ट नगरसेवक म्हणून सन्मान देखील केला आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सरदार तारासिंग, भाजप – ९३,८५०
२) चरणसिंग सप्रा, काँग्रेस – २८,५४३
३) प्रभाकर शिंदे, शिवसेना – २६,२५९
४) सत्यवान दळवी, मनसे – १३,४३२
५) नंदकुमार वैती, राष्ट्रवादी – ४८८०

नोटा – १७४८

मतदानाची टक्केवारी – ५७.४६ %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ
First Published on: August 12, 2019 8:10 PM
Exit mobile version