नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८६

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८६

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८६

नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे आतापर्यंत चांगले वर्चस्व होते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी सहापैकी पाच मतदारसंघात कांग्रेसचा उमेदवार निवडून आणला होता. नांदेड उत्तर बाबत बोलायचे झाल्यास २०१४ साली भाजप – शिवसेना वेगवेगळी लढल्यामुळे विद्यमान आमदार डी.पी.सावंत यांचा अतिशय कमी मताधिक्याने विजय झाला होता. या मतदारसंघात मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची मतदारसंख्या अधिक आहे. २०१४ साली एमआयएमनेही इथे तगडी लढत दिली होती. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्यास काँग्रेसला आपला उमेदवार टिकवणे यावेळी कठिण जाऊ शकते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचाही परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसू शकतो.

मतदारसंघ क्रमांक – ८६

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,७३,७०७
महिला – १,५८,००५
एकूण मतदान – ३,३१,७२२

विद्यमान आमदार – डी.पी. सावंत, काँग्रेस

डी.पी.सावंत यांचे पुर्ण नाव दत्तात्रय पांडूरंग आहे. सावंत हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र नांदेडचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे चांगले सख्य आहे. चव्हाण यांनी २००९ मध्ये सावंत यांना नांदेड उत्तर मतदारसंघाची उमेदवारी दिली. पृथ्वीराज चव्हाम मुख्यमंत्री असताना सावंत यांना राज्यमंत्रीपदी काम करण्याची संधी देण्यात आली होती.

यावेळी सावंत यांच्याविरोधात मतदारसंघात नाराजी पसरलेली आहे. मध्यंतरी विकासकामांचे भूमिपूजन करत असताना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तसेच या कार्यक्रमात त्यांच्या पीएने लोकांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे लोकांनी त्यांना मारहाण केली.

आमदार डी.पी. सांवत

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डी. पी. सावंत, काँग्रेस – ४०,३५६
२) सुधाकर पांढरे, भाजप – ३२,७५४
३) अब्दुल हबिब अब्दुल रहिम, एमआयएम – ३२,३३३
४) मिलिंद देशमुख चाटे, शिवसेना – २३,१०३
५) सुरेश गायकवाड, बसपा – २०,२५४


हे वाचा – नांदेड लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 20, 2019 5:13 PM
Exit mobile version