नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८७

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८७

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८७

नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नांदेड हे मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचे सर्वात मोठे शहर आहे. नांदडेमध्ये चव्हाण यांचे चागंलेच राजकीय वर्चस्व आहे. त्यांच्या वर्चस्वाला २०१४ मध्ये पहिल्यांदा धक्का बसला तो नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून.

मतदारसंघ क्रमांक – ८७

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५६,८०१
महिला – १,४४,२००
एकूण मतदान – ३,०१,००१

विद्यमान आमदार – हेमंत पाटील, शिवसेना

शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. त्याआधी विद्यार्थी असताना ते विविध सामाजिक चळवळींमध्ये भाग घेत होते. नांदेडचे युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. २००९ मध्ये त्यांना नांदेड दक्षिणमधून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांनी अखेर विजय मिळवला. २०१३ मध्ये त्यांनी गोदावरी अर्बन बँक सुरु केली होती. तसेच गोदावरी पब्लिक स्कूलचीही स्थापना केली. शेतकऱ्यांची मुले शाळेत अनवाणी जाऊ नयेत, यासाठी त्यांनी मी अनवाणी ही योजना सुरु करत अनेकांना बूट मिळवून दिले होते.

आमदार हेमंत पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) हेमंत पाटील, शिवसेना – ४५,८३६
२) दिलीप कांडकुर्ते, भाजप – ४२,६२९
३) मोईन मुख्तार, एमआयएम – ३४,५९०
४) ओमप्रकाश पोकर्ना, काँग्रेस – ३१,७६२
५) अन्वर जावेद मोहम्मद कौसर, बसपा – ४४११


हे वाचा – नांदेड लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 20, 2019 5:21 PM
Exit mobile version