निलंगा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३८

निलंगा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३८

निलंगा विधानसभा मतदारसंघ

लातूर जिल्ह्यातील निलंगा हा क्रमांक २३८ वा विधानसभा मतदारसंघ आहे. लातूर जिल्ह्यातील लक्षवेधी असलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ. येथे ती नात्यांची लढाई पाहायला मिळते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील या राजकीय लढाईमुळे हा मतदारसंघ राज्यभर चर्चेत राहिला आहे. १९६२ मध्ये शिवाजीराव पहिल्यांदा आमदार झाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. १९८५ ते ८६ या कालावधीत ते मुख्यमंत्री झाले.

मतदारसंघ क्रमांक – २३८

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,५२,०३४

महिला – १,३३,०१५

एकूण मतदार – २,८५,०४९

विद्यमान आमदार – संभाजीराव निलंगेकर-पाटील, भाजप

संभाजी पाटील निलंगेकर हे राज्याचे कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, मजी सैनिक कल्याण, कामगार विकासमंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले आहेत. २००४ आणि त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यंनी आपले आजोबा, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. राज्यात भाजपची सत्ता आल्याने त्यांना पंचायत राज समितीचे अध्यक्षपद मिळाले. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून संभाजी पाटील निलंगेकर ओळखले जातात. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिक निवडणुकीत निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळाले. संभाजी पाटील यांना त्यांच्या घरातूनच राजकीय वारसा मिळाला. आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री, वडील स्व. दिलीपराव पाटील निलंगेकर आमदार तर आई रुपाताई निलंगेकर या लातूरमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

आमदार संभाजीराव निलंगेकर-पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संभाजीराव निलंगेकर-पाटील, भाजप – ७६,८१७

२) अशोक निलंगेकर, काँग्रेस – ४९,३०६

३) रेशमे विश्वनाथप्पा, मविआ – १७,६७५

४) बसवराज पाटील, राष्ट्रवादी – १६,१४९

५) अभय साळुंखे, मनसे – १६,०१५

हेवाचा – ४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 10, 2019 11:20 AM
Exit mobile version