घरमहा @४८४१ - लातूर लोकसभा मतदारसंघ

४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

Subscribe

लातूरने जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री दिले. विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर लातूरने दिले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर देखील लातूरचेच. काँग्रेसचे इतके मातब्बर नेते लातूरमध्ये असताना देखील काँग्रेसचा हा गड आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार हा विधानसभेचा एक मतदारसंघ येतो तर लातूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ येतात.


मतदारसंघ क्रमांक – ४१

- Advertisement -

नाव – लातूर

संबंधित जिल्हा – नांदेड, लातूर

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती (SC)

मतदारांची संख्या (२०१४) – १६ लाख ८२ हजार ६०७

पुरुष – ८ लाख ९७ हजार ९१२

महिला – ७ लाख ८४ हजार ६८८


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सुधाकर तुकाराम श्रृंगारे -भाजप- ६ लाख ६१ हजार ४९५

मच्छिंद्र कामत – काँग्रेस – ३ लाख ७२ हजार ३८४

राम गर्कर -वंचित बहुजन आघाडी – १ लाख १२ हजार २५५

नोटा – ६ हजार ५६४


लातूर मधील विधानसभा मतदारसंघ

नांदेड

८८ लोहा – प्रतापराव चिखलीकर, शिवसेना

लातूर

२३४ लातूर ग्रामीण – त्रिबंकराव भिसे, काँग्रेस

२३५ लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

२३६ अहमदपूर – विनायकराव जाधव पाटील, अपक्ष

२३७ उदगीर (SC) – सुधाकर भालेराव, भाजप

२३८ निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील, भाजप

 


mp dr sunil gaikwad
लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड

विद्यमान खासदार – डॉ. सुनील गायकवाड, भाजप

लोकसभेत शंभर टक्के उपस्थिती लावणाऱ्या खासदारांपैकी सुनील गायकवाड एक आहेत. ज्यावेळी ते मतदारसंघात असतात तेव्हा ते सर्वांसोबत संवाद साधून असतात. स्वपक्षीयाबरोबरच त्यांनी इतर पक्षातील नेत्यांसोबतही चांगला संवाद ठेवला आहे.

डॉ. सुनील गायकवाड हे पुर्वी पत्रकारिता करत होते. दैनिक सुपूत्र वर्तमानपत्रात ते संपादक होते. २००९ साली डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात गायकवाड यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काटे की टक्कर दिली. केवळ सात हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. गायकवाड हे राजकारणासोबत सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. भारत-बांग्लादेश समन्वय समितीने त्यांना आंतरराष्ट्रीय बुद्ध शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संसदेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्काराने २०१८ साली गौरविण्यात आले आहे. गायकवाड यांनी चार वर्षात केंद्र सरकारकडून लातूरच्या विकासासाठी १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणले. तसेच अमेरिकेत झालेल्या माहिती तंत्रज्ञान जागतिक परिषदेत गायकवाड यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करुन भारताने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती जगाला करुन दिली.


२०१४ मधील मतांची आकडेवारी

डॉ. सुनील गायकवाड, भाजप – ६ लाख १६ हजार ५०९

दत्तात्रय बनसोडे, काँग्रेस – ३ लाख ६३ हजार ११४

दिपक कांबळे, बसपा – २९ हजार ०२९

दिपरत्न निलंगेकर, आप – ९ हजार ८२९

नोटा – १३ हजार ९८२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -