पालघर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३०

पालघर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३०

पालघर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३०

पालघर हा विधानसभा क्रमांक १३० चा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण मतदान केंद्र आहेत. तसेच पालघर विधानसभा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे ठाण्यातील बडे नेते एकनाथ शिंदे यांचा या मतदारसंघात प्रभाव आहे. तर ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीला मानणारे मतदारही आहेत. पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. या मतदार संघावर सर्वच पक्षाचे लक्ष असते. तसेच पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित हे कॉंग्रेसकडून २० हजार ९७१ मताधिक्य मिळवून निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेले कृष्णा घोडा यांनी गावित यांचा अवघ्या ५१५ मतांनी पराभव केला. त्यानंतर शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या अकाली निधनामुळे पालघर विधानसभेची जागा रिकेत झाली. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांना उमेदवारी दिली.

मतदारसंघ क्रमांक – १३०

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती


मतदारांची संख्या

पुरुष –,२४,०१८

महिला –,१७,०५४

एकूण मतदार –, ४१. ०७९


विद्यमान आमदार – अमित कृष्णा घोडा

अमित कृष्णा घोडा हे शिवसेनेचे विद्यमान आमदार असून त्यांनी २०१४ साली त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच पक्षाचे राजेंद्र गावित यांचा १९ हजार मतांनी पराभव केला आहे. पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांना मिळालेल्या कार्यकाळात जे लोकांवर आपली छाप पाडू शकलेले नाहीत, त्याबरोबर आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी परकीयांना मदत केल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. दरम्यान, आमदार निधीचा फायदा जवळच्या कार्यकर्त्यांना देऊन इतरांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघातील मतदार त्यांच्याबद्दल उघडउघड नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील महिला शिवसैनिकांची मागणी वेगळीच आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक आणि पत्रकार असलेल्या वैदेही वाढणे यांचे नावही पुढे येत आहे.

 


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या


नोटा – ४१८८

मतदानाची टक्केवारी – ६८.११ %


हेही वाचा – पालघर लोकसभा मतदारसंघ


 

First Published on: July 31, 2019 2:02 PM
Exit mobile version