घरमहा @४८२२ - पालघर लोकसभा मतदारसंघ

२२ – पालघर लोकसभा मतदारसंघ

Subscribe

असा आहे पालघर लोकसभा मतदारसंघ

पालघर लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेस, भाजप, बविआ यांच्यात चुरस पाहायला मिळाली आहे. पालघर आदिवासी जिल्हा असला, तरी पालघर मतदारसंघात वसई, विरार आणि नालासोपारा हे गुजराती भाषिक भाग जोडले गेल्यामुळे भाजपकडे हक्काची वोटबँक आल्याचं बोललं जात आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाण्यापासून वेगळा काढत पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली खरी. मात्र, पालघर लोकसभा मतदारसंघ आधीपासूनच अस्तित्वात असल्यामुळे तिथली मतदार विभागणी साधारणपणे सारखीच राहिली आहे. काँग्रेसचे दामू शिंगडा हे या मतदारसंघातून तब्बल ५ वेळा खासदार राहिले होते. मात्र, २०१४मध्ये काँग्रेसनं माघार घेत बविआला पाठिंबा दिल्यामुळे दामू शिंगडा यांनी बंडखोरी करून त्यांचा मुलगा सचिन शिंगडाला निवडणुकीत उतरवलं होतं. मात्र, भाजपच्या चिंतामण वनगा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय साजरा केला.

मतदारसंघाचा क्रमांक – २२

- Advertisement -

नाव – पालघर

संबंधित जिल्हे – पालघर

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेतीपीक – तांदूळ

शिक्षणाचा दर्जा – ७४%


पुरुष – ७८%

महिला – ७२%

मतदारसंघ राखीव – अनुसूचित जमाती

एकूण मतदार(२०१८) – १७ लाख ३१ हजार २९२

महिला – ८ लाख २३ हजार ५९४

पुरुष मतदार – ९ लाख ०७ हजार ६१३


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

राजेंद्र गावित – शिवसेना – ५ लाख ८० हजार ४७९

बळीराम जाधव – बविआ – ४ लाख ९१ हजार ५९६

नोटा – २९ हजार ४७९

दत्तराम जयराम करबत – अपक्ष – १३ हजार ९३२

सुरेश अर्जुन पाडवी – वंचित बहुजन आघाडी – १३ हजार ७२८


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१२८ – डहाणू(अनुसूचित जमाती) – जान्या धनारे, भाजप

१२९विक्रमगड(अनुसूचित जमाती) – विष्णु सावरा, भाजप

१३० – पालघर (अनुसूचित जमाती) – कृष्णा घोडा, शिवसेना

१३१बोईसर (अनुसूचित जमाती) – विलास तरे, बविआ

१३२नलासोपारा – हितेंद्र ठाकूर, बविआ

१३३वसई – विष्णू ठाकूर – बविआ


Palghar MP Rajendra Gavit
पालघर खासदार राजंद्र गावित

विद्यमान खासदार – राजेंद्र गावित, भाजप

२०१४मध्ये भाजपच्या तिकिटावर चिंतामण वनगा खासदार म्हणून निवडून गेले होते. तेव्हा काँग्रेसच्या तगड्या पाठिंब्यावर आणि हितेंद्र ठाकूरांच्या कडव्या प्रचाराच्या जोरावर उभे राहिलेल्या बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांचा तब्बल ३ लाख मतांनी त्यांनी पराभव केला होता. मात्र, २०१८मध्ये त्यांचं निधन झाल्यामुळे मे महिन्यात पोट निवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपच्याच तिकिटावर उभ्या राहिलेल्या राजेंद्र गावितांचा अवघ्या २० हजार मतांनी विजय झाला. या निवडणुकीत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी पक्षात दुर्लक्षाच्या कारणाखाली बंडखोरी करत शिवसेनेची कास धरली. शिवसेनेच्या तिकिटावर श्रीनिवास वनगांनी राजेंद्र गावितांना कडवी झुंज दिली. २०१४मध्ये राजेंद्र गावितांनी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र काँग्रेसनं ऐन वेळी माघार घेत बविआला पाठिंबा दिला. मात्र श्रीनिवास वनगांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपने ऐन वेळी राजेंद्र गावितांना उमेदवारी देऊ केली आणि पोटनिवडणुकीत पालघरची जागा राखली. राजेंद्र गावित काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात आदिवासी विकास मंत्री होते. २०१८मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना गावितांची संपत्ती ८ कोटी ७७ हजार होती. २०१६मध्ये आमदारकीच्या पोटनिवडणुकीत त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख होती. त्यामुळे फक् दोन वर्षांत कोणत्याही पदाशिवाय त्यांची संपत्ती सुमारे २ कोटींनी कशी वाढली? याची बरीच चर्चा रंगली होती.

२०१८मधी पोटनिवडणुकीची आकडेवारी

राजेंद्र गावित – भाजप – २ लाख ७२ हजार ७८२

श्रीनिवास वनगा – शिवसेना – २ लाख ४३ हजार २१०

बळीराम जाधव – बविआ – २ लाख २२ हजार ८३८

किरण गहेला – माकप – ७१ हजार ८८७

दामोदर सिंगाडा – काँग्रेस – ४७ हजार ७१४

नोटा – १६ हजार ८८४

मतदानाची टक्केवारी – ४८%


EX MP Chintaman Wanaga
दिवंगत खासदार चिंतामण वनगा

२०१४ मधील आकडेवारी

चिंतामण वनगा – भाजप – ५ लाख ३३ हजार २०१

बळीराम जाधव – बविआ – २ लाख ९३ हजार ६८१

रूपा खरापडे – माकप – ७६ हजार ८८८

नोटा – २१ हजार ७९०

हरिभाऊ वर्था – अपक्ष – १२ हजार ९७३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -