पाथरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९८

पाथरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९८

पाथरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९८

परभणी जिल्ह्यातील पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पाथरी हा मतदारसंघ १९९० पासून शिवसेनेच्या ताब्यात होता. २००४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचा पराभव करत राष्ट्रवादीचे खाते उघडले. मात्र २००९ च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत शिंगणापूर मतदारसंघ पाथरीमध्ये विसर्जित करण्यात आला. तर सेलू तालुका जिंतूर विधानसभेत टाकण्यात आला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ साली शिवसेनेच्या मीरा रेंगे विजयी झाल्या तर २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी बाजी मारली.

विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांचे पाथरी मतदारसंघावर चांगली पकड आहे. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे. पाथरी नगरपरिषदेत दुर्राणी यांनी २२ पैकी २२ सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आणले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना पाथरी मधून चांगले मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे राष्ट्रवादी यावेळी हा मतदारसंघ स्वतःकडे मागून घेण्याची शक्यता आहे.

मतदारसंघ क्रमांक – ९८

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,७४,१४४
महिला – १,५९,३९४
एकूण मतदान – ३,३३,५९४

विद्यमान आमदार – मोहन फड, अपक्ष

मोहन फड हे २०१४ साली अपक्ष निवडून आले असले तरी यावेळी ते भाजपमधून लढण्यास इच्छूक आहेत. मात्र जागावाटपात पाथरी शिवसेनेकडे आहे. तसेच बाजुचे जिंतूर आणि गंगाखेड मतदारसंघही शिवसेनेकडे असून तेथिल स्थानिक नेते ते मतदारसंघ भाजपकडे ओढून घेण्यास प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पाथरी भाजपला न मिळाल्यास मोहन फड यावेळी देखील अपक्ष निवडणूक लढवू शकतात. मोहन फड यांनी मागच्या पाच वर्षात मतदारसंघात चांगली विकासकामे केली असल्याचे इथले मतदार सांगतात.

आमदार मोहन फड

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मोहन फड, अपक्ष – ६९,०८१
२) सुरेश वरपुडकर, काँग्रेस – ५५,६३२
३) अब्दुल्लाह खान, राष्ट्रवादी – ४६,३०४
४) मीरा रेंगे, शिवसेना – ३५,४०८
५) कॉम्रेड विलास बाबर, सीपीएम – ५,५१७


हे वाचा – परभणी लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 21, 2019 6:58 PM
Exit mobile version